नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क केंद्र सरकारने दोन रुपयांनी कमी केल्यानंतर राज्यांनीही यावरील व्हॅट पाच टक्क्यांनी कमी करावा, यासाठी हालचाली सुरू झाल्याने इंधनाचे भडकलेले दर आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. केंद्राने उत्पादन शुल्क दोन रुपयांनी घटविले. परंतु बुधवारी पेट्रोल व डिझेलच्या किमती अनुक्रमे २.२५ रुपये २.५० रुपयांनी
कमी झाल्या.
इंधनाच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक हिस्सा केंद्र व राज्यांच्या करांचा असतो. नोटाबंदी आणि जीएसटीपाठोपाठ इंधनाच्या चटक्यांनी जनतेमध्ये क्षोभ उसळल्यानंतरही करांना कात्री लावण्यास वित्त मंत्रालय किंवा तेल मंत्रालय तयार नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
दखल घेतल्यानंतर दर कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
खुशखबर...! पेट्रोल, डिझेलचे दर आणखी कमी होणार
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क केंद्र सरकारने दोन रुपयांनी कमी केल्यानंतर राज्यांनीही यावरील व्हॅट पाच टक्क्यांनी ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:57 AM2017-10-05T05:57:54+5:302017-10-05T05:58:22+5:30