Lokmat Money > बिझनेस न्यूज > खुशखबर! 4-5 रुपयांनी स्वस्‍त होणार पेट्रोल-डिझेल; जाणून घ्या, केव्हा होऊ शकते घोषणा?

खुशखबर! 4-5 रुपयांनी स्वस्‍त होणार पेट्रोल-डिझेल; जाणून घ्या, केव्हा होऊ शकते घोषणा?

Petrol-Diesel Price: ओएमसीच्या बॅलेन्स शीटमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली असून आर्थिक वर्ष 2024 मध्ये जबरदस्त नफा नोंदवण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 03:50 PM2023-06-23T15:50:07+5:302023-06-23T15:50:42+5:30

Petrol-Diesel Price: ओएमसीच्या बॅलेन्स शीटमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली असून आर्थिक वर्ष 2024 मध्ये जबरदस्त नफा नोंदवण्याची शक्यता आहे.

Good news Petrol-diesel will be cheaper by Rs 4-5 oil companies can announce in august before election | खुशखबर! 4-5 रुपयांनी स्वस्‍त होणार पेट्रोल-डिझेल; जाणून घ्या, केव्हा होऊ शकते घोषणा?

खुशखबर! 4-5 रुपयांनी स्वस्‍त होणार पेट्रोल-डिझेल; जाणून घ्या, केव्हा होऊ शकते घोषणा?

जर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे आपण त्रस्त असाल, तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या एक वर्षाहूनही अधिक काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कसलाही बदल झालेला नाही. मात्र आता ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMC) पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार आहेत. याच वर्षाच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात काही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्या (OMC) ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात 4 ते 5 रुपये प्रति लिटरची कपात करू शकतात. 

80 डॉलरपेक्षाही कमी राहील किंमत -
जेएम फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटीजने एका रिसर्चमध्ये म्हटल्यानुसार, तेल कंपन्यांचे मुल्यांकन व्यवस्थित होताना दिसत आहे. मात्र, इंधन विपणन व्यवसायातील कमाईत मोठी अनिश्चितता आहे. ओपेक प्लसच्या (Opec+) मजबूत किंमतीमुळे पुढील 9 ते 12 महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. तसेच, क्रूड ऑइलची किंमत 80 डॉलर प्रत‍ि बॅरलच्या खाली राहील, असा तेल कंपन्यांना विश्वास आहे. मात्र हे, सरकारकडून होणाऱ्या आर्थिक वर्ष 2023 च्या अंडर-रिकव्हरच्या भरपाईवर अवलंबून आहे.

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात काही मुख्य राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांना ऑगस्टपासून पेट्रोल/डिझेलच्या किंमतीत 4 ते 5 रुपये प्रति लिटरची कपात करण्यास सांगितले जाऊ शकते. कारण, ओएमसीच्या बॅलेन्स शीटमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली असून आर्थिक वर्ष 2024 मध्ये जबरदस्त नफा नोंदवण्याची शक्यता आहे. मात्र, संबंधित रिपोर्टमध्ये संभाव्य कपातीची टाइमलाईन आणि प्रमाणाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, यावर अवलंबून असेल.

Web Title: Good news Petrol-diesel will be cheaper by Rs 4-5 oil companies can announce in august before election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.