Join us

शुभचिन्हे : ऑगस्टमध्ये वाढला सेवाक्षेत्राचा पीएमआय, मार्च महिन्यानंतर गाठला उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 5:28 AM

जुलै महिन्यात देशाच्या सेवाक्षेत्राचा पीएमआय ३४.२ होता तो ऑगस्टमध्ये ४१.८ वर पोहोचला आहे. मार्च महिन्यानंतर प्रथमच हा इंडेक्स या उंचीवर पोहोचला आहे.

नवी दिल्ली : भारताच्या सेवाक्षेत्राचा परचेस मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ऑगस्ट महिन्यामध्ये वाढला असला तरी अद्याप त्याने पूर्णपणे वाढ दाखविलेली नाही. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अद्यापही कामकाजावर बंधने असल्यामुळे हे क्षेत्र पूर्णपणे कार्यरत झालेले नाही.जुलै महिन्यात देशाच्या सेवाक्षेत्राचा पीएमआय ३४.२ होता तो ऑगस्टमध्ये ४१.८ वर पोहोचला आहे. मार्च महिन्यानंतर प्रथमच हा इंडेक्स या उंचीवर पोहोचला आहे.आयएचएस मार्किट इंडियाने देशाच्या सेवा क्षेत्राचा आॅगस्ट महिन्याचा परचेस मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) जाहीर केला आहे. सलग सहाव्या महिन्यामध्ये हा इंडेक्स ५०च्या खाली राहिला आहे. पीएमआय हा ५० अथवा त्यापुढे असल्यास तो वाढ दर्शवितो तर ५० पेक्षा कमी पीएमआय संबंधित क्षेत्रामध्ये घसरण झाल्याचे सूचित करीत असतो. जुलै महिन्यामध्ये सेवा आणि उत्पादन क्षेत्राचा एकत्रित पीएमआय ३७.२ होता. त्यामध्ये आॅगस्ट महिन्यामध्ये वाढ होऊन तो ४६ वर पोहोचला आहे.मात्र सलग पाचव्या महिन्यामध्ये तो ५० पेक्षा कमीच राहिला आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये या क्षेत्रात वाढ होत असून नोकऱ्या गमावणाऱ्यांची संख्याही घटत आहे.ही आहेत घसरणीची प्रमुुख कारणेभारताच्या सेवाक्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. यामधील कामकाज हे मुख्यत: आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून होत असते. कोरोनामुळे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू असल्याने कामकाज कमीच झाले आहे.भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कर्मचाºयांना घरून काम करण्याची परवानगी दिली असली तरी या कंपन्यांकडे येणारे कामच कमी झाल्याने या क्षेत्रामध्ये घट बघावयास मिळते.नवीन कामे मिळण्याचे प्रमाण लक्षणीय घटल्यामुळे सेवाक्षेत्रातील प्रतिकर्मचारी उत्पादन कमी होत आहे. भारतामध्ये निर्बंध काही प्रमाणात कमी झाले असले तरी अद्यापही ते पूर्णपणे हटलेले नाहीत. त्याचाही फटका बसत आहे.कमी होणारा महसूल आणि वाढणारा खर्च यामुळे या क्षेत्राला दुसºया तिमाहीमध्ये तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यानंतर कंपन्यांनी आपल्या फीमध्ये वाढ केली आहे.

टॅग्स :अर्थव्यवस्थाव्यवसायलॉकडाऊन अनलॉक