Lokmat Money > बिझनेस न्यूज > PNB ग्राहकांसाठी खूशखबर! जर तुमच्याकडेही डेबिट कार्ड असेल तर 2 लाखांचा मिळेल लाभ

PNB ग्राहकांसाठी खूशखबर! जर तुमच्याकडेही डेबिट कार्ड असेल तर 2 लाखांचा मिळेल लाभ

PNB Debit Card : बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit-Credit Card) दिले जातात आणि सर्वांवर विविध प्रकारच्या ऑफर आणि सुविधा उपलब्ध आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 06:18 PM2021-12-22T18:18:20+5:302021-12-22T18:18:50+5:30

PNB Debit Card : बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit-Credit Card) दिले जातात आणि सर्वांवर विविध प्रकारच्या ऑफर आणि सुविधा उपलब्ध आहेत.

Good news for PNB customers! If you also have a debit card, you will get a benefit of Rs 2 lakh | PNB ग्राहकांसाठी खूशखबर! जर तुमच्याकडेही डेबिट कार्ड असेल तर 2 लाखांचा मिळेल लाभ

PNB ग्राहकांसाठी खूशखबर! जर तुमच्याकडेही डेबिट कार्ड असेल तर 2 लाखांचा मिळेल लाभ

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत (PNB Debit Card) खाते असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही पीएनबीचे ग्राहक असाल आणि तुमच्याकडे बँकेचे डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला पूर्ण 2 लाखांचा लाभ मिळू शकतो. याशिवाय, बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit-Credit Card) दिले जातात आणि सर्वांवर विविध प्रकारच्या ऑफर आणि सुविधा उपलब्ध आहेत. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला पीएनबी रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डबाबत (PNB Rupay Platinum Debit Card) काही माहिती देणार आहोत. पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.

पीएनबीने केले ट्विट
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, पीएनबीसोबत आपली खरी मजा अनबॉक्स करा. PNB RuPay Platinum Debit Card द्वारे तुम्हाला अनेक विशेष फायदे मिळतील.

PNB RuPay Platinum Debit Card द्वारे फायदे...
- ग्राहकांना एअरपोर्ट लॉजमध्ये मोफत प्रवेश मिळेल 
- Amazon आणि Swiggy वर 20% पर्यंत सूट
- 2 लाख रुपयांपर्यंत मोफत अपघाती विमा
- एक्सक्लुझिव्ह मर्चेंट ऑफर
- 24/7 Concierge Services

अधिकृत लिंकला भेट द्या
या कार्डबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही  https://tinyurl.com/2p96m2h7 या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला या कार्डबद्दल तपशीलवार माहिती मिळेल.

Web Title: Good news for PNB customers! If you also have a debit card, you will get a benefit of Rs 2 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.