नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) पुन्हा एकदा ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. एसबीआयने मंगळवारी कर्जावरील दर (एमसीएलआर)च्या मार्जिन कॉस्टमध्ये 35 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.35 टक्क्यांनी कपात केली आहे. नवीन दर 10 एप्रिलपासून लागू होणार आहेत. यापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने(आरबीआय) दिलेल्या सल्ल्यानुसार पॉलिसी रेटचा पूर्ण फायदा एसबीआयने 27 मार्च रोजी ग्राहकांना दिला होता. एसबीआयने देखील एक्सटर्नल आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 75-75 बेस पॉइंटने म्हणजे ०.७५ टक्क्यांनी कमी केला होता.
एसबीआयने एमसीएलआरच्या दरात कपात केल्यानंतर बँकेचा एक वर्षाचा एमसीएलआर 7.75 टक्क्यांवरून 7.40 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. किरकोळ कर्ज आणि वर्षभराच्या कालावधीसाठी हा कर्जावरील दर ठरवला जातो. बँकेने बचत खात्यांच्या ठेवीवरील व्याजदरही 0.25 टक्क्यांनी कमी करून 2.75 टक्क्यांवर आणल्याची घोषणा केली आहे.
गृहकर्जाच्या EMIमध्ये होणार अशी बचत
एसबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "या कपातीमुळे एमसीएलआरला जोडलेल्या 30 वर्षांसाठीच्या गृहकर्जाच्या EMIमध्ये प्रतिलाखावर 24 रुपयांची बचत होणार आहे.
एसबीआयने यापूर्वी 0.75 टक्के केली होती कपात
यापूर्वी एसबीआयने बाह्य कर्जदर (ईबीआर)मध्ये 0.75 टक्क्यांची कपात केली होती, त्यानंतर ते 7.80 टक्क्यांवरून 7.05 टक्क्यांपर्यंत खाली आले होते. त्याचप्रमाणे रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट(आरएलएलआर)मध्ये 0.75 टक्क्यांनी कपात केली. एसबीआयच्या या निर्णयानंतर आरएलएलआर 7.40 टक्क्यांवरून 6.65 टक्क्यांवर आला. एसबीआयच्या या दोन्ही कर्जदर कपातीमुळे ग्राहकाला याचा फायदा पोहोचणार आहे. बँकेकडून 30 वर्षांच्या कालावधीसाठी गृहकर्जे घेणाऱ्या ग्राहकांची प्रतिलाखामागे 52 रुपयांची EMIमध्ये बचत होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही एसबीआयकडून 30 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर तुमचा ईएमआय 1,560 रुपयांनी कमी होणार आहे.
Good News! SBIची पुन्हा एकदा व्याजदरात कपात; EMIमध्ये होणार 'एवढी' बचत
रिझर्व्ह बॅंकेने(आरबीआय) दिलेल्या सल्ल्यानुसार पॉलिसी रेटचा पूर्ण फायदा एसबीआयने 27 मार्च रोजी ग्राहकांना दिला होता. एसबीआयने देखील एक्सटर्नल आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 75-75 बेस पॉइंटने म्हणजे ०.७५ टक्क्यांनी कमी केला होता.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 09:13 PM2020-04-07T21:13:22+5:302020-04-07T21:15:23+5:30