नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा तब्बल 44 कोटींहून अधिक ग्राहकांना होणार आहे. करोना काळात अगदी सर्वसामान्य नागरिकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असतानाच बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेने घेतलेल्या या निर्णयानुसार, आता ग्राहकांना SMS शुल्क आकारले जाणार नाही. तसेच त्याना त्यांच्या खात्यात किमान मासिक रक्कमही ठेवावी लागणार नाही. बँकेचा हा निर्णय बँकेच्या सर्व बचत खातेधारकांसाठी लागू असणार आहे. बँकेने 18 ऑगस्टला ही माहिती दिली. यापूर्वी एसबीआयच्या बचत खात्यांत किमान रक्कम ठेवावी लागत होती. अन्यथा ग्राहकांना शुल्क आकारले जात होते. मात्र, आता हा नियम बदलण्यात आला आहे.
या वर्षीच मार्च महिन्यातच बँकेने सर्व बचत खात्यांवरील किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचा नियम रद्द केल्याची घोषणा केली होता. यामुळे आता बचत खाते धारकाला त्याच्या खात्यात शून्य रक्कम असली तरीही शुल्क आकारले जाणार नाही. यापूर्वी मेट्रो शहरातील खातेधारकांना खात्यात किमान 3 हजार रुपये, छोट्या शहरांतील खातेधारकांना किमान 2 हजार रुपये तर ग्रामीण भागांतील खातेधारकांना किमान 1 हजार रुपये ठेवावे लागत होते.
मेट्रो शहरांमध्ये ATM मधून महिन्याला 8 वेळा पैसे काढण्याची मुभा -स्टेट बँक मेट्रो शहरांमध्ये एका ATM कार्डाद्वारे महिन्याला 8 वेळा विनाशुल्क पैसे काढण्याची मुभा देते. याचाच अर्थ जर तुम्ही मेट्रो शहरात राहत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क न आकारता 8 वेळा पैसे काढता येणार आहेत. मात्र, यानंतर केल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रान्झेक्शनवर तुम्हाला शुल्क आकारले जाणार आहे. SBI ATM मधून फ्री पैसे काढण्याच्या नियमांनुसार (ATM Withdrawal Rules) स्टेट बँकेच्या एटीएममधून ५ वेळा आणि अन्य बँकांच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढता येतात. मेट्रो शहरांमध्ये मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद सहभागी आहेत.
छोट्या शहरांतील SBI ग्राहकांना एटीएममधून 10 वेळा पैसे काढता येणार - याशिवाय गैर मेट्रो शहरांमध्ये SBI चे खातेधारक 10 वेळा एटीएममधून विनाशुल्क पैसे काढू शकतात. यामध्ये 5 वेळा SBI ATM मधून आणि 5 वेळा अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. ही लिमिट संपल्यानंतर बँक तुमच्याकडून 10 रुपये ते 20 रुपये शुल्क वसूल करू शकते.
10000 रुपयांपेक्षा अधिक पैसे काढताना OTP पाठवला जाणार -याशिवाय खातेधारकाला एटीएममधून 10000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर त्याला त्याच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) पाठवला जाईल. तो ओटीपी पुन्हा एटीएममध्ये टाकून पैसे काढता येणार आहेत. ही ओटीपीची सुविधा रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएमणधून पैसे काढत असाल तर ओटीपी पाठविला जाणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!
15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया
CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!
CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर