Join us

आनंदाची बातमी! चांदी घसरली, 2000 रुपयांनी कोसळली! सोनंही 600 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 'लेटेस्ट रेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 1:58 PM

मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅमवर. तसेच, पुण्यात 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम.

जर आपण आज सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज (गुरुवार, 13 जून 2024) चांदी जवळपास 2,000 रुपयांपर्यंत घसरल्याचे दिसत आहे.  तर सोनेही कालच्या तुलनेत 600 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. 2,000 रुपयांची घसरण झाल्यानंतर, आज चांदी 88,500 रुपये प्रति किलोच्या जवळपास आहे.

चांदी 2,000 रुपयांनी स्वस्त -मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ती कालच्या तुलनेत 1921 रुपये प्रति किलोने स्वस्त होऊन 88,524 रुपये प्रति किलोवर आली आहे. बुधवारी वायदे बाजारात चांदीचा भाव 90,554 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

सोनंही 600 रुपयांनी स्वस्त - वायदे बाजारात चांदीसोबतच सोनेही स्वस्त झाले आहे. गुरुवारी MCX वर सोने कालच्या तुलनेत 582 रुपयांनी स्वस्त होऊन 71,388 रुपयांवर आले आहे. बुधवारचा विचार करता सोने 71,970 रुपयांवर बंद झाले होते. महत्वाचे म्हणजे, देशांतर्गत बाजारासोबतच परदेशातही सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली आहे.

असे आहेत देशातील काही प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर -- दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोनं 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 95,200 रुपये प्रति किलोग्रॅम.- चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोनं 72,660 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 95,200 रुपये प्रति किलोग्रॅम.- मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम- पाटण्यात 24 कॅरेट सोनं 72,210 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम- पुण्यात 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम.- कोलकात्यात 24 कॅरेट सोनं 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम. - नोएडामध्ये 24 कॅरेट सोनं 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम.- लखनऊमध्ये 24 कॅरेट सोनं 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम - गुरुग्राममध्ये 24 कॅरेट सोनं 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम विकले जात आहे.

टॅग्स :सोनंचांदीबाजारगुंतवणूक