मुंबई - जर तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मान्सून ऑफर आणली आहे. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त कार लोन आणि होम लोन मिळू शकेल.
बँक ऑफ महाराष्ट्रने १ ऑगस्ट २०२२ पासून रिटेल बोनान्झा-मान्सूक धमाका ऑफर लॉन्च केलं आहे. बँकेने आपल्या महा सुपर होम लोन आणि महा सुपर कार लोन योजनांसाठी फुल प्रोसेसिंग फीवर सूट देण्यात येणार आहे.
सणासुदीच्या सध्याच्या काळात बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या रिटेल ग्राहकांसाठी अनेक विशेष ऑफर देऊ केल्या आहेत. बँक ७.७० टक्के व्याजदराने होमलोन आणि ७.७० व्याज दराने कार लोन देत आहे. रिटेल प्रॉडक्ट्ससोबत अनेक आकर्षक सुविधांचा प्रस्तावही देण्यात आला आहे. त्यामध्ये होम लोनमध्ये रेग्युलर रीपेमेंटवर तीन ईएमआय फ्री, कार आणि होम लोनवर ९० टक्क्यांपर्यंत कर्जाची सुविधा, तसेच कर्जावर कुठलाही पार्ट टाईम चार्ज नसेल, तसेच प्री क्लोजर चार्ज आणि प्री पेमेंट चार्जसुद्धा नसेल.
तसेच बँक ३ लाख रुपयांपर्यंत शून्य प्रोसेसिंग फीसोबत ७.७० टक्क्यांच्या आकर्षक व्याज दरावर २५ लाख रुपयांपर्यंत सोने तारण कर्ज देण्याची सुविधासुद्धा देत आहे. बँकेने १५ मिनिटांच्या आत सोने तारण कर्ज देण्यासाठी आपल्या विविध शाखांमध्ये एक विशिष्ट्य काऊंटर स्थापन केला आहे.