Lokmat Money > बिझनेस न्यूज > TATA चा धमाका! 400 रुपयांपासून मिळतंय Netflix सह 13 OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन

TATA चा धमाका! 400 रुपयांपासून मिळतंय Netflix सह 13 OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन

TATA Play : पाहा काय आहे यात खास. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं मिळतंय सबस्किप्शन.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 01:13 PM2022-03-15T13:13:02+5:302022-03-15T13:14:38+5:30

TATA Play : पाहा काय आहे यात खास. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं मिळतंय सबस्किप्शन.

good news tata play come with netflix zee5 sonyliv voot many ott and internet subscription at just 400 rupees know details | TATA चा धमाका! 400 रुपयांपासून मिळतंय Netflix सह 13 OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन

TATA चा धमाका! 400 रुपयांपासून मिळतंय Netflix सह 13 OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन

TATA Play म्हणजेच पूर्वीचं टाटा स्काय (TATA Sky) अन्य कंपन्यांच्या तुलनेत आपल्या ग्राहकांना अनेक चांगल्या ऑफर्स आणि सेवा पुरवत आहे. टाटा प्ले देशातील असा प्रमुख एकमेव डीटीएच सर्व्हिस प्रोव्हायडर आहे जो आपल्या मासिक आणि वार्षिक चॅनल पॅक्सवर अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सह नेटफिक्सचाही लाभ देत आहे. कंपनी गी सेवा  'टाटा प्ले बिंज कॉम्बोस' या नावानं पुरवत आहे.

Tata Play Binge Combos चे फायदे
Tata Play Binge Combos प्लॅनसोबत ग्राहकांना नेटफ्लिक्सची (Netflix) ची सेवाही दिली जात आहे. अन्य डिटीएच ऑपरेटर आपल्या ग्राहकांना ही सेवा पुरवत नाही. Binge सबस्क्रिप्शन पहिलेच १२ ओटीटी अॅप्स अॅक्सेससह येतो. याशिवाय युझर्सना आता टीव्ही चॅनल्ससह नेटफ्लिक्सचा अॅक्सेसही देण्यात येत आहे. Binge subscription मध्ये डिस्ने + हॉटसटार (Disney+ Hotstar), झी फाईव्ह (ZEE5), सोनी लिव्ह (SonyLIV), वूट सिलेक्ट (Voot Select), शिमारू मी (ShemarooMe), सन नेक्स्ट (SunNXT), इरॉस नाऊ (Eros Now), हंगामा प्ले (Hungama Play), वूट किड्स (Voot Kids), क्युरिऑसिटी स्ट्रिम (Curiosity Stream), एपिक ऑन (EpicON), डॉक्युबे (Docubay) या अॅप्सचा समावेश आहे. /

हे प्लॅन्स ४०० रुपये प्रति महिनापासून १००० रुपये प्रति महिन्यापर्यंत उपलब्ध आहे. तुम्ही कंपनीच्या मोबाईल अॅप किंवा वेबसाईटवर सर्व टाटा प्ले बिंज कॉम्बो पॅक पाहू शकता. टाटा प्ले बिंज कॉम्बो पॅकची चांगली बाब म्हणजे युझर्सना टीव्ही चॅनल पॅकसाठी वेगळा खर्च करावा लागत नाही.

यामध्ये असे अनेक पॅक्स आहेत, जे नेटफ्लिक्ससह येतात. यामध्ये SD आणि HD दोन्ही चॅनल्सचा समावेश आहे. याशिवाय कंपनी ग्राहकांसाठी एकूण टीव्ही चॅनलची कॉस्ट कमी करण्यासाठी काही ग्राहक जे चॅनल्स पाहत नाही ते चॅनल्स आपल्या बुकेतून बाहेरही करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु TATA Play Binge कॉम्बो पॅक त्यांच्याकडेच काम करेल, ज्यांच्याकडे कंपनीचा Binge+ सेट टॉप बॉक्स आहे. हा सेट टॉप बॉक्स २४९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. हा Google Voice Assistant, Chromecast आणि सपोर्टसोबत येणारा एक स्मार्ट STB आहे.

Web Title: good news tata play come with netflix zee5 sonyliv voot many ott and internet subscription at just 400 rupees know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.