आयकर विभागानं (Income Tax Department) या महिन्याच्या सुरूवातीला आयटीआर (ITR) दाखल करणाऱ्यांची चुकीनं कापण्यात आलेली लेट पेमेंट फी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. लेट पेमेंट फीस कापल्यामुळे समस्या निर्माण झालेल्या सर्व करदात्यांसाठी ही दिलासा मिळणार आहे. ३० जुलै रोजी आयटीआर रिटर्न केल्यानंतर ज्या लोकांची लेट पेमेंट फी आणि अतिरिक्त व्याज कापलं केलं आहे ते परत केली जाणार असल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे.
आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार आटीआर सॉफ्टवेअरमधील समस्येमुळे लेट फी कापली गेली. परंतु ती १ ऑगस्ट रोजी ठीक करण्यात आली. या चुकीमुळे ३० जुलैनंतर आयटीआर दाखल करणाऱ्या लोकांचं सेक्शन 234A अंतर्गत व्याज आणि सेक्शन 234F अंतर्गत लेट पेमेंट फीची चुकीच्या पद्धतीनं गणना केली जात होती आणि ते लोकांच्या खात्यातून कापले जात होते.
काय आहे प्रकरण ?आयकर विभागानं नवं पोर्टल सुरू केल्यापासून (Income Tax new Website) अनेकांना समस्यांचा सामना करावा लागला होता. या महिन्याच्या सुरूवातीला एक नवी समस्या निर्माण झाली होती. ३१ जुलैनंतर इन्कम टॅक्स फाईल करणाऱ्यांची लेट पेमेंट पेनल्टी कापण्यात आली. याची अंतिम तारीख आता वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे. सामान्यत: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अखेरची तारीख ३१ जुलै असते. परंतु करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर ही तारीख पुढे ढकलण्यात आली असून त्यासाठी ३० सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
किती होती लेट पेमेंट फी?आयकरच्या कलम 234F नुसार जर कोणत्याही करदात्यानं ३१ जुलैनंतर ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न दाखल केलं तर त्याच्याकडून ५ हजार रूपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. डिसेंबरनंतर या दंडाची कमाल मर्यादा ही १० हजार रूपये होते.