कोरोना संकटामुळे कंपन्यांच्या नवीन कर्मचारी भरतीवर रोख लागलेली असताना गुणवत्ता असलेल्या लोकांची मागणीदेखील वाढली आहे. कंपन्या योग्य उमेदवाराच्या शोधात आहेत, असे गुडगावच्या आरजीएफ प्रोफेशनल रिक्रुटमेंट फर्मने म्हटले आहे. (Healthcare and Technology to remain key recruiting sectors for India's recovery in 2021)
कोरोनामुळे कंपन्यांकडील कामाचा ओघ कमी झाला आहे. सर्व क्षेत्रांवर हा परिणाम जाणवत आहे. 'आरजीएफ इंटरनॅशनल रिक्रूटमेंट्स सॅलरी वॉच २०२०: इंडिया' या नावाने हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये भारतातील कार्पोरेट सेक्टरला कोरोनाचा मोठा फटका बसल्याचे म्हटले आहे.
या अहवालामध्ये अने कंपन्यांच्या 19000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पगाराची माहिती विचारात घेण्यात आली आहे. यामध्ये कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाईबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी अंदाजपत्रक आणि बेंचमार्क ठरविण्यात आले आहेत. यामुळे कंपनी आणि कर्मचारी अशा दोन्हींना फायदा होणार आहे. भारतीय कंपन्यांच्या एचआर, अॅडमीन, फायनान्ससह सर्व डिपार्टमेंटमध्ये पगार कपात पहायला मिळाली आहे.
आरजीएफचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कुलश्रेष्ठ यांच्यानुसार कंपनीला योग्य उमेदवार नियुक्त करण्यासाठीची क्षमताच कोरोना महामारीच्या आव्हानांपासून वाचण्यास मदत करणार आहे. . हेल्थकेयर सर्व्हिस आणि फार्मास्युटिकल प्रोडक्शनची मोठी मागणी असल्याने या क्षेत्रात पगार वाढ होण्याची शक्यता आहे.
कंपन्यांच्या वरिष्ठांची पदे आणि आर अँड डी विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे.
- कोरोनाने सर्व कंपन्यांना त्यांच्या डिजिटल रणनीतिवर पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे. फाइनान्शियल टेक्नोलॉजी (Fintech) ते हेल्थटेक (Healthtech) आणि ई-कॉमर्स (e-commerce) सारख्या सर्व कंपन्यांना डिजिटल ट्रांसफॉर्मेशन करावे लागले आहे.
सॉफ्टवेयर डेवलपमेंट (Software Development), आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI), रोबोटिक्स (Robotics) आणि डेटा सायन्स (Data Science) शी जोडलेल्या लोकांसाठी खुशखबर आहे. त्यांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. भविष्यात त्यांचे पॅकेज 50 लाख ते 80 लाख वर्षाला आणि नोकरी बदलल्यास 40 टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.