Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुड न्यूज! ही टेक कंपनी देणार १० हजार नोकऱ्या

गुड न्यूज! ही टेक कंपनी देणार १० हजार नोकऱ्या

सुमारे १ हजार विद्यार्थ्यांना ऑफर लेटर मिळाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 05:44 AM2024-04-13T05:44:27+5:302024-04-13T05:44:57+5:30

सुमारे १ हजार विद्यार्थ्यांना ऑफर लेटर मिळाले आहेत.

Good news! This tech company will provide 10 thousand jobs | गुड न्यूज! ही टेक कंपनी देणार १० हजार नोकऱ्या

गुड न्यूज! ही टेक कंपनी देणार १० हजार नोकऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएसने यंदा मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली असून हजारो ऑफर लेटर जारी केले आहेत. विविध आयटी महाविद्यालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी सुमारे १० हजार नवपदवीधरांना कंपनी संधी देत आहे. नव्या वित्त वर्षात मागणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कंपनी जोरात भरती प्रक्रिया राबवित आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

सूत्रांनी सांगितले की, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सुमारे १ हजार विद्यार्थ्यांना ऑफर लेटर मिळाले आहेत. त्यातील १० टक्के लेटर प्राइम श्रेणीतील आहेत. सस्त्रा विद्यापीठाला २ हजार ऑफर लेटर मिळाले आहेत.

कितीचे पॅकेज मिळणार?
nटीसीएसने गेल्या महिन्यात ‘नॅशनल क्वालिफायर टेस्ट’ घेण्याची घोषणा केली होती. या टेस्टद्वारे कंपनी नवपदवीधरांची भरती करते. २६ एप्रिल रोजी ही टेस्ट होणार आहे. टेस्टद्वारे ३ श्रेणीत भरती होईल. 
nनिंजा श्रेणीत सहायक भूमिका दिली जाईल व ३.५ लाखांचे पॅकेज असेल. डिजिटल व प्राइम श्रेणीत विकास काम दिले जाईल. त्यांचे पॅकेज ७ ते ११.५ लाख रुपये असेल.

Web Title: Good news! This tech company will provide 10 thousand jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.