कोरोनाच्या दुसर्या लाटेचा मोठा फटका भारताला बसला होता. कोरोनाबाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. दरम्यान, या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लस हा एक चांगला पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. जास्तीत जास्त लोकांना लवकरच लसी दिली जावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत प्रयत्न करत आहेत. आता बर्याच बँकासुद्धा या मोहिमेत सामील झाल्या आहेत. ज्या लोकांचं लसीकरण झालं आहे त्यांना एफडीवर अधिक व्याज दिलं जाईल असं अनेक बँकांकडून जाहीर करण्यात आलं आहे. ही ऑफर केवळ मर्यादित काळासाठी आहे.ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असेल आणि त्यांनी ९९९ दिवसांसाठी एफडी केली तर त्यांना अतिरिक्त ३० बेसिस पॉईंट्स दिले जातील, असं UCO बँकेनं म्हटलं आहे. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार ही ऑफर ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे.सेंट्रल बँकेनंही नुकतीच 'इम्यून इंडिया डिपॉझिट स्कीम' लाँच केली होती. या अंतर्गत ११११ दिवसांसाठी एफडीवर २५ अतिरिक्त बेसिस पॉईंट्स देत आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त लाभ देण्यात येत आहे. लसीकरणाला चालना देण्यासाठी बँकेनं 'इम्यून इंडिया डिपॉझिट स्कीम' लाँच केली असल्याचं बँकेनं ट्विटरद्वारे सांगितलं.
लस घेतलेल्या नागरिकांसाठी खुशखबर; 'या' बँका देतायत FD वर अधिक व्याजदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 17:09 IST
Higher Interest Rates : काही बँकांनी यापूर्वीच सुरू केली होती योजना. खासगी आणि सरकारी क्षेत्रातील बँकांनीही दिल्या आहेत ऑफर.
लस घेतलेल्या नागरिकांसाठी खुशखबर; 'या' बँका देतायत FD वर अधिक व्याजदर
ठळक मुद्देकाही बँकांनी यापूर्वीच सुरू केली होती योजना. खासगी आणि सरकारी क्षेत्रातील बँकांनीही दिल्या आहेत ऑफर.