नवी दिल्ली : यंदा सलग तिसऱ्या वर्षी चांगला मान्सून राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे ग्राहक वस्तू उत्पादक कंपन्या उत्साहित झाल्या आहेत. यामुळे वस्तूंची मागणी वाढेल, असे या कंपन्यांनी म्हटले आहे.
रेफ्रिजरेटर, टीव्ही, ट्रॅक्टर, दुचाकी, छोट्या कार आदी उत्पादित करणाºया एलजी, मारुती सुझुकी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि होंडा मोटारसायकल्स अॅण्ड स्कूटर इंडिया आदी कंपन्यांना चांगल्या पावसाचा लाभ होईल. एलजीचे संचालक (विक्री) संजीव अगरवाल आणि हीरो मोटारसायकल्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष वाय. एस. गुलेरिया यांनी सांगितले की, चांगला पाऊस झाल्याने आम्हाला लाभ होईल; कारण आमची ग्रामीण भागीत विक्री वाढेल.
चांगल्या पावसाचे भाकीत; कंपन्या उत्साहामध्ये
चांगला पाऊस झाल्याने आम्हाला लाभ होईल; कारण आमची ग्रामीण भागीत विक्री वाढेल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:17 AM2018-04-20T01:17:13+5:302018-04-20T01:17:13+5:30