देशात सणासुदीला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत लोक मोठ्या संख्येने सोने खरेदी करतात. दरम्यान, सोन्याच्या दरात वाढ होत आहे. गेल्या महिन्यात सोन्याचा भाव 50,000 रुपयांच्या खाली गेला होता, त्यात आता वाढ होताना दिसत आहे. सोन्यात तेजी येण्याचे कारण म्हणजे सणासुदीमुळे त्याची मागणी वाढली आहे. यासोबतच जागतिक बाजारात अनेक गोष्टींचा प्रभाव असल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आता अर्थतज्ज्ञ सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.
सोन्याच्या दरात वाढ का होतेय?जागतिक बाजारात सोन्याचा दर सध्या 1,700 डॉलरच्या आसपास आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याशिवाय गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत आहे. विदेशी गुंतवणूकदारांना सध्या स्टॉक मार्केट आणि फॉरेक्समध्ये गुंतवणूक करणे योग्य वाटत नाही. रुपया व्यतिरिक्त इतर देशांचे चलन जसे की युरो, पाउंड इत्यादी विक्रमी खालच्या पातळीवर आहेत. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार सोन्यात पैसे गुंतवण्याकडे आकर्षित होत आहेत.
देशांतर्गत बाजाराची स्थितीऑक्टोबर महिना सुरू झाल्याने सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. या महिन्यात दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. अशा परिस्थितीत सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. सणासुदीचा काळ पाहता येत्या दोन ते तीन महिन्यांत देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव ५३,५०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
आताच्या परिस्थितीकडे लक्ष दिल्यास येत्या काही दिवसांत सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत ते गुंतवणूकदारांना त्यात पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जात आहे. गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीपैकी 20 टक्के गुंतवणूक सोन्यात गुंतवू शकतात. स्टॉक मार्केटमध्ये घसरण दिसून येत असली तरी गुंतवणूकदारांना सोन्यातून बंपर परतावा मिळण्याची अपेक्षा आहे, असे तज्त्रांचे मत आहे.