Join us

गुडन्यूज... टाटा मोटर्सची मोठी घोषणा; ईव्ही कारच्या किंमतीत १.२० लाखांची कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 1:18 PM

पंच ईव्ही कारमध्ये कुठलीही कपात करण्यात आली नाही. 

नवी दिल्ली - देशातील दिग्गज आणि नामवंत कार कंपनी असलेल्या टाटाने ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टाटा कंपनीने ग्राहकांना गिफ्ट देत ईव्ही कारच्या किंमतीत कपात केली आहे. त्यानुसार, टाटा नेक्सॉन आणि टियागो ईव्ही कारच्या किंमतीत तब्बल १ लाख २० हजार रुपयांनी कमी करण्यात आल्याची घोषणा कंपनीने केली. या कारमध्ये वापरात येत असलेल्या बॅटरींच्या किंमतीत घट झाल्याने कंपनीने कारच्या किंमतीत कपात केली आहे. 

टाटाने केवळ नेक्सॉन आणि टियोगा याच कारच्या किंमतीत कपात केल्याची घोषणा केली असून नुकतेच लाँच करण्यात आलेल्या पंच ईव्ही कारमध्ये कुठलीही कपात करण्यात आली नाही. 

 टाटा कंपनीच्या घोषणेनंतर टाटा टियागो ईव्ही ७.९९ लाख रुपयांपासून सुरू होत आहे. तर नेक्सॉनच्या ईव्ही कारची किंमत १४.४९ लाख रुपयांपासून सुरू होत आहे. नेक्सॉन ईव्हीची लाँग रेंजची किंमत १६.९९ लाख रुपयांपासून सुरू होत आहे. 

टॅग्स :टाटाकारव्यवसायइलेक्ट्रिक कार