Flipkart News : तुम्ही अनेकदा Flipkart वरुन विविध वस्तू मागवल्या असतील. या वस्तू तुमच्यापर्यंत येण्यासाठी काही दिवस लागतात. पण, आता Flipkart भारतात आपले क्विक कॉमर्स सर्व्हिस लॉन्च करणार आहे. Flipkart Minutes असे याचे नाव असून, जुलै महिन्यात याची सुरुवात होऊ शकते. या नवीन सेवेद्वारे अवघ्या 15 मिनिटांत तुमचे सामान डिलिव्हर केले जाणार आहे. विशेष म्हणजे, कंपनीने यापूर्वीदेखील अशाप्रकारची सेवा सुरू केली होती, पण त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही.
क्विक कॉमर्स मार्केटमध्ये येण्याची Flipkart ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी कंपनीने दोनवेळा अयशस्वी प्रयत्न केला आहे. सध्या या क्षेत्रात Blinkit, Zepto, BBNow सारख्या कंपन्यांचा दबदबा आहे. विशेषतः Blinkit सर्वाधिक चालणारा ब्रांड आहे.
15 मिनिटांत सामाल डिलिव्हर होणार
मिळालेल्या माहितीनुसार, Flipkart Minutes च्या माध्यमातून कंपनीने फक्त 15 मिनिटांत वस्तू डिलिव्हर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी 15 जुलै रोजी ही सेवा सुरू करू शकते. ही सेवा सुरळीत चालवण्यासाठी Flipkart ला आपल्या सध्याच्या सप्लाय चेनचा फायदा होईल.
Flipkart Minutes द्वारे कंपनी फक्त ग्रॉसरीच नाही, तर इतर सामान कमी वेळेत पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करेल. यात इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सदेखील सामील आहेत. यापूर्वी कंपनीने Flipkart Quick नावाने आपली सेवा सुरू केली होती, ज्यात 90 मिनिटांत सामान डिलिव्हर केले जायचे.
कोरोनापासून क्विक कॉमर्सचे मार्केट वाढले
कोरोना महामारीनंतर क्विक कॉमर्स मार्केटमध्ये वाढ झाली आहे. Blinkit देखील आपल्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करत आहे. Flipkart सोबतच Reliance देखील या मार्केटमध्ये लक्ष ठेवून आहे.