दिग्गज टेक कंपनी गुगल पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करू शकते. यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. गुगल (Google) सतत त्यांच्या AI मॉडेल्सना प्रगत करण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनी केवळ एक्सटर्नल अॅप्लिकेशनसाटी एआय विकासावर लक्ष केंद्रित करत नाही, तर तिच्या ऑपरेशनल स्ट्रक्चरमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा देखील विचार करत असल्याचं अलिकडील संकेतांवरून दिसून येतंय.
काय आहे गुगलचा प्लॅन?
द इन्फॉर्मेशनच्या अलीकडील रिपोर्टनुसार, गुगल एआयला त्यांच्या व्यवसाय प्रक्रियेच्या अनेक पैलूंमध्ये इंटिग्रेट करण्याची तयारी करत आहे. यामुळे कंपनी आपले कर्मचारी मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते. सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
या रिस्ट्रक्चरिंगचा प्रामुख्यानं Google च्या जाहिरात विक्री विभागावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या विभागात कंपनी ऑपरेशनल एफिशिअन्सीसाठी AI चा वापर करण्याची तयारी करत आहे. जाहिरात विक्रीव्यतिरिक्त, Google कस्टमर सपोर्ट सर्व्हिसेसमध्येदेखील AI चा वापर करू शकते. कस्टमर सपोर्टमध्ये AI चा वापर कंपनीच्या ऑपरेशन्सच्या ह्युमन सेंट्रिक पैलूंवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
Google : AI मुळे जाऊ शकते कर्मचाऱ्यांची नोकरी, ३०००० कर्मचाऱ्यांना नारळ मिळण्याची शक्यता
दिग्गज टेक कंपनी गुगल पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करू शकते.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 03:37 PM2023-12-29T15:37:46+5:302023-12-29T15:42:40+5:30