Lokmat Money > बिझनेस न्यूज > लय भारी... गुगल-एअरटेल आणणार स्वस्त स्मार्टफोन

लय भारी... गुगल-एअरटेल आणणार स्वस्त स्मार्टफोन

७५१० कोटींची केली गुंतवणूक; ५ जी तंत्रज्ञानसाठीही मोठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 09:02 AM2022-01-29T09:02:48+5:302022-01-29T09:03:15+5:30

७५१० कोटींची केली गुंतवणूक; ५ जी तंत्रज्ञानसाठीही मोठी मदत

Google-Airtel to bring cheap smartphones | लय भारी... गुगल-एअरटेल आणणार स्वस्त स्मार्टफोन

लय भारी... गुगल-एअरटेल आणणार स्वस्त स्मार्टफोन

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गुगल आणि  एअरटेलने स्वस्त स्मार्टफोन आणि ग्राहकांना ५ जी तंत्रज्ञान देण्यासाठी हातमिळवणी केली आहे. याअंतर्गत गुगल भारतीय दूरसंचार कंपनी भारती एअरटेलमध्ये १०० कोटी डॉलरची (७५१० कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. यामधील ७० कोटी डॉलर (५२५७ कोटी रुपये) च्या मदतीने गुगल भारती एअरटेलमध्ये आपली हिस्सेदारी खरेदी करणार असून, एकत्रितपणे स्वस्त फोन विकसित करील आणि ५ जी तंत्रज्ञानावर संशोधन करील.

शुक्रवारी दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगल एअरटेलमधील १.२८ टक्के हिस्सेदारी ७३४ रुपये प्रति समभाग या दराने खरेदी करील. याशिवाय, उर्वरित ४०० कोटी डॉलर (२२५३ हजार कोटी रुपये) अनेक वर्षांसाठी व्यावसायिक कराराच्या स्वरूपात गुंतवले जातील.
गुगलसोबत भागीदारी करून सर्व किंमतींमधील स्मार्टफोन  उपलब्ध करून देण्यात येतील. याशिवाय, दोन्ही कंपन्या भारताच्या स्थानिक परिस्थितीनुसार ५ जी नेटवर्कवर एकत्र काम करतील. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे देशातील व्यवसायासाठी क्लाउड इकोसिस्टमला प्रोत्साहन देणार आहेत.

गुगल आणि एअरटेल यांच्यातील भागीदारीचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आहे. आज शेअर बाजारात एअरटेल समभागांच्या किमती ७०६.९५ वरून ७२१.९५ रुपयांवर पोहोचल्या. यावर्षी आतापर्यंत एअरटेलच्या किमती ४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीला त्याचा एक शेअर ६९१.३० रुपये होता. एका वर्षाच्या कालावधीत यात २८ टक्के वाढ झाली आहे.

 

Web Title: Google-Airtel to bring cheap smartphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.