कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, अनेक कंपन्या आणि कार्यालयं बंद करण्यात आलेली आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देत आहेत. विशेष म्हणजे गुगलनेही आपल्या कर्मचार्यांना अशी सुविधा दिलेली असून, वर्क फ्रॉम होमचा कालावधी पुढील वर्षाच्या जूनपर्यंत वाढविला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनीने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे कर्मचारी जुलै 2021पर्यंत घरातून काम करू शकतात. यासंदर्भात गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीही कर्मचार्यांना ईमेल पाठविला आहे.
या ई-मेलमध्ये पिचाई यांनी लिहिले आहे की, 'कर्मचार्यांना पुढील नियोजन वाढवण्यासाठी आम्ही वर्क फ्रॉम होमचा पर्याय 30 जून 2021 पर्यंत वाढवत आहोत. हे अशा लोकांसाठी असेल ज्यांना कार्यालयातून काम करण्याची आवश्यकता नाही. अमेरिकेच्या एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सुंदर पिचाई यांनी हा निर्णय गूगलच्या काही वरिष्ठ अधिका-यांशी सल्लामसलत केल्यानंतर घेतला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने गुगलच्या या घोषणाची माहिती दिली आहे. गुगलच्या 2 लाखांहून अधिक कर्मचारी आणि कंत्राटदारांना याचा फायदा होणार आहे. याआधी गुगलने घरातूनच कामाचा पर्याय जानेवारीपर्यंतच ठेवला होता.
गुगलच्या या निर्णयानंतर आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासह इतर मोठ्या कंपन्याही आपल्या कर्मचार्यांसाठी घरापासून कामा(वर्क फ्रॉम होम)चा कालावधी वाढवू शकतात, अशी अपेक्षा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांना आपल्या कर्मचार्यांची काळजी असल्याचं दिसत आहे.
ट्विटरकडूनही वर्क फ्रॉम होमची संधी
काही टेक कंपन्यांनी आशा व्यक्त केली आहे की, येत्या काही महिन्यांत ते हळूहळू कार्यालये उघडतील. अलीकडेच सोशल मीडिया कंपनी ट्विटरने जाहीर केले की, त्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून अनिश्चित काळासाठी काम करू शकतात. फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे की, येत्या दशकात सोशल मीडिया कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी घरातून काम करतील.
गुगलनं कर्मचाऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट; आता जून 2021पर्यंत करता येणार वर्क फ्रॉम होम
यासंदर्भात गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीही कर्मचार्यांना ईमेल पाठविला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 10:30 PM2020-07-27T22:30:36+5:302020-07-27T22:31:13+5:30