Google CEO Sundar Pichai: करोडपती किंवा अब्जोपती बनण्यासाठी नोकरी नाही, तर स्वतःचा व्यवसाय करावा लागतो, अशी अनकांची धारणा आहे. महिन्याच्या पगारावर करोडपती किंवा अब्जोपती होता येत नाही, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचा विचार करताय. पगार मिळवणारे लोकही अब्जाधीश होऊ शकतात. Google चे CEO म्हणून काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी हे सिद्ध करुन दाखवलं आहे.
सुंदर पिचाई हे जगातील सर्वाधिक कमाई करणारे CEO बनले आहेत. आपण त्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो, तर ती आता जवळपास 1 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. याचा अर्थ सुंदर पिचाई लवकरच अब्जाधीशांच्या यादीत सामील होतील आणि त्यांना अब्जाधीशाचा टॅग मिळेल. विशेष म्हणजे, दोन खोल्यांच्या छोट्या अपार्टमेंटमध्ये राहणारे सुंदर पिचाई आज अब्जावधीच्या संपत्तीचे मालक बनले आहेत.
पियाई यांच्यामुळे कंपनीची चमकदार कामगिरीसुंदर पिचाई गेल्या 7 वर्षांपासून Google चे CEO म्हणून काम करत आहेत. पिचाई यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने अतिशय चमकदार कामगिरी केली आहे. कंपनीच्या शेअर्समध्येही 400% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तुम्ही या वाढीची तुलना अमेरिकन शेअर बाजाराशी केली, तर तुम्हाला दिसेल की, Google च्या शेअर्सनी S&P 500 आणि Nasdaq पेक्षा खूप चांगली कामगिरी केली आहे. याशिवाय त्यांच्या नेतृत्वात कंपनीने इतिहासात प्रथमच इतका नफा कमावला आहे.
सुंदर पिचाई यांना कसा फायदा झाला?
गुगलचे सीईओ म्हणून सुंदर पिचाई यांना मोठा पगार मिळतो. पगाराव्यतिरिक्त त्यांना मिलियन डॉलर्सचे स्टॉक, म्हणजेच कंपनीचे शेअर्सदेखील मिळतात. गुगलच्या शेअर्सनी 400 टक्के परतावा दिल्याने सुंदर पिचाई यांच्या शेअर्सची किंमतही वाढली आहे. पगाराबद्दल बोलायचे तर त्यांचा पगारही वर्षानुवर्षे दुप्पट आणि तिप्पट होत गेला. तीन वर्षांपूर्वी सुंदर पिचाई यांचा पगार $2 मिलियन होता, जो गेल्या वर्षी $6.3 मिलियन झाला आहे.
मदुराई ते गुगलचा प्रवासमदुराई ते गुगलचे CEO होण्याचा प्रवास सुंदर पिचाई यांच्यासाठी सोपा नव्हता. भारतातील चेन्नई येथे जन्मलेल्या सुंदर यांचे बालपण अडचणींनी भरलेले होते. संपूर्ण कुटुंब दोन खोल्यांच्या छोट्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. एका मुलाखतीत पिचाई यांनी सांगितले होते की, त्यांच्या बालपणात त्यांच्याकडे टीव्ही किंवा कारसारख्या सुविधा नव्हत्या. ते 12 वर्षांचे असताना कुटुंबात पहिला टेलिफोन आला. या टेलिफोनने त्यांना तंत्रज्ञानाच्या जवळ आणले. त्यांची आवड तंत्रज्ञान उद्योगाकडे वाढली. खरगपूर IIT मधून इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमएस आणि व्हार्टन स्कूल ऑफ पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून एमबीए केले. 2004 मध्ये गुगलमध्ये रुजू झाले आणि 2015 मध्ये त्यांना Google चे सीईओ बनवण्यात आले. यानंतर 2019 मध्ये त्यांच्यावर Alphabet Inc या कंपनीचीही जबाबदारी देण्यात आली.