Join us  

ना IIT, IIM, IIIT, NIT, 'या' कॉलेजमधून शिक्षण घेतलं, आता गुगुलनं दिलं १ कोटींचं पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 1:28 PM

गुगलमध्ये नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते.

गुगलमध्ये नोकरी करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. पण काहींना संधी मिळते काहींना मिळत नाही, गुगलमध्ये शक्यतो IIT, IIM, IIIT अशा शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेल्यांनाच संधी मिळते, पण झारखंडमधील एका तरुणाने या कोणत्याच शिक्षण संस्थेत शिक्षण न घेता गुगलमध्ये नोकरी मिळवली आहे. झारखंडमधील बोकारो येथे राहणारा इरफान भाटी सध्या चर्चेत आहे. गुगलने त्याला करोडोंच्या पॅकेजवर नियुक्त केले आहे. भाटी हे लंडनमधील गुगलच्या रिसर्च टीमचा एक भाग बनले आहेत. 

गुपचूप आपलेच शेअर खरेदीचा आरोप; अदानी समूहानं दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, "हे दावे..."

गुगलने इरफान भाटी याल वार्षिक १ कोटी २० लाख रुपयांचे पॅकेज ऑफर केले आहे. तो २९ ऑगस्टलाच गुगलमध्ये रुजू झाला. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले इरफान भाटी यापूर्वी गुगल इंडियामध्ये कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी बायजू आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांमध्येही काम केले आहे.

इरफान भाटीने २०२४ मध्ये पिट्स मॉडर्न पब्लिक स्कूल, गोमिया येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने २०१९ मध्ये पश्चिम बंगालच्या हल्दिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर इरफानने व्यावसायिक म्हणून कॉर्पोरेट जगतात प्रवेश केला.

इरफान सांगतात, त्याला लहानपणापासूनच कॉम्प्युटर सायन्समध्ये रस होता. दहावीच्या वर्गातच त्याने मोबाईल अॅप्लिकेशन बनवले होते. आजच्या काळात सॉफ्टवेअर क्षेत्रात अनेक संधी असल्याचे त्यांनी युवकांना सांगितले. युवकांनी या क्षेत्रात यावे, असंही म्हणाले. 

इरफान साध्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आला आहे. त्याचे वडील अब्दुल यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. तर आई रुखसाना खातून यांचे निधन झाले आहे. इरफान त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या वडिलांना आणि आईला देतो.

टॅग्स :गुगलझारखंड