नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ग्रुपचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ आणि गुगलच्या भागिदारीची घोषणा केली. गुगलकडून ७.७ टक्के भागिदारीत रिलायन्स जिओमध्ये ३३,७३७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.यापूर्वी फेसबुकने जिओसोबत ९.९९ टक्क्यांची भागिदारी करीत ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी यांनी आत्तापर्यंत जिओची भागीदारी विकून तब्बल १.१८ लाख कोटी रुपये कमावले आहेत.रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ ५ जी रोडमॅपच्या घोषणेनंतर बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत जवळपास दीड टक्क्यांनीवाढून दोन हजार रुपयांवर गेलीहोती. यापूर्वी मंगळवारी हेशेअर्स १ हजार ९१७ रुपयांवरबंद झाले होते. २२ मार्च रोजी८६७ रुपयांच्या नीचांक असलेले शेअर्स तुलनेत १२५ टक्क्यांनीवाढले आहेत.काळाआधी कर्जमुक्तीचे आश्वासनकोरोनाच्या संकटकाळातही गुंतवणूकदारांच्या वतीने त्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रचंड गुंतवणूक आणण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल जिओ प्लॅटफॉर्मवर २२ एप्रिल ते १२ जुलै या कालावधीत एकूण २५.२४ टक्क्यांच्या विक्रीतून कंपनीला १,१८,३१८.४५ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. या व्यतिरिक्त, कंपनीने विद्यमान भागधारकांना राइट इश्यू जारी करत ५३,१२४ कोटी रुपये जमा केले.
रिलायन्स जिओमध्ये गुगलची ३३,७३७ कोटींची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 1:07 AM