Lokmat Money > बिझनेस न्यूज > आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी Google चा पुढाकार; Spam Calls साठी नवीन फिचर लाँच, कोण वापरू शकते?

आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी Google चा पुढाकार; Spam Calls साठी नवीन फिचर लाँच, कोण वापरू शकते?

Google Spam Calls feature : आर्थिक फ्रॉड रोखण्यासाठी गुगलने अँड्रॉईड युजर्ससाठी नवीन फीचर लाँच केलं आहे. आता स्मॅम कॉल आल्यानंतर तुम्हाला आधीच अलर्ट करण्यात येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 05:00 PM2024-11-15T17:00:56+5:302024-11-15T17:02:15+5:30

Google Spam Calls feature : आर्थिक फ्रॉड रोखण्यासाठी गुगलने अँड्रॉईड युजर्ससाठी नवीन फीचर लाँच केलं आहे. आता स्मॅम कॉल आल्यानंतर तुम्हाला आधीच अलर्ट करण्यात येईल.

google launches ai based spam call detection feature google will alert when spam calls come | आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी Google चा पुढाकार; Spam Calls साठी नवीन फिचर लाँच, कोण वापरू शकते?

आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी Google चा पुढाकार; Spam Calls साठी नवीन फिचर लाँच, कोण वापरू शकते?

Google Spam Calls feature : देशात इंटरनेटच्या स्पीडसोबत सायबर गुन्हेगारीही वेगाने वाढत चालली आहे. रोज हजारो नागरीकांना वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक गंडा घातला जात आहे. आजकाल, स्पॅम कॉलद्वारे फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये खूप वाढ होत आहे. फक्त एका कॉलने लोकांची बँक खाती काही मिनिटांत रिकामी होतात. हा प्रकार रोखण्यासाठी तुम्ही गुगलची (Google) मदत घेऊ शकता. गुगलनेअँड्रॉईड (Android) युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. या फीचर्सद्वारे स्पॅम कॉल आल्यावर Google कडून अलर्ट किंवा नोटिफिकेशन मिळेल. AI बेस्ड अ‍ॅडव्हान्स्ड स्पॅम कॉल डिटेक्शन फीचर (Spam Call Detection Feature) असे याचे नाव आहे.

Google AI बेस्ड अ‍ॅडव्हान्स्ड स्पॅम कॉल डिटेक्शन फीचर 
गुगलने या वर्षी आयोजित Google I/O 2024 मध्ये पहिल्यांदा स्पॅम कॉल शोधण्यासाठी हे फीचर सादर केले होते. आता गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे या AI स्पॅम कॉल डिटेक्शन फीचरची घोषणा केली आहे. कोणत्याही अँड्रॉईड फोनमध्ये स्पॅम कॉल आल्यास युजर्सला नोटीफिकेशन पाठवले जाते. या फीचरमुळे आर्थिक घोटाळ्यांना आला बसेल असा दावा गुगलने केला आहे.

स्पॅम कॉल आल्यावर २ पर्याय मिळणार
अँड्रॉइड फोनवर स्पॅम कॉल आल्यानंतर हे फीचर सक्रीय होते. युजरला मोबाईल स्क्रीनवर Not a Scam आणि End Call असे २ पर्याय दिसतात. अलर्ट आल्यानंतर फोन घ्यायचा की डिस्कनेक्ट करायचा हे युजरवर अवलंबून आहे. Google कडून स्पॅम अलर्ट मिळाल्यानंतरही कॉल चालू ठेवायचा असेल तर तो Not a Scam पर्याय निवडू शकतो.

कोण वापरू शकतो?
गुगलचे AI बेस्ड अ‍ॅडव्हान्स्ड स्पॅम कॉल डिटेक्शन फीचर  सध्या फक्त अमेरिकेतील निवडक वापरकर्ते वापरू शकतात. केवळ अँड्रॉइड बीटा वापरकर्त्यांना याचा एक्सेस आहे. हे फीचर लवकरच सर्व अँड्रॉईड युजर्ससाठी सुरू करण्यात येणार आहे.
 

Web Title: google launches ai based spam call detection feature google will alert when spam calls come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.