Join us

Google ने १३,७६,५९,६२,५०,००० रुपयांचा नफा कमावला; तरीही १२ हजार लोकांना नोकरीवरुन काढलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 1:09 PM

Google Layoffs News: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन 'गुगल'ची मूळ कंपनी अल्फाबेटने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Google Layoffs News: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन 'गुगल'ची मूळ कंपनी अल्फाबेटने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. अल्फाबेट वर्कर्स युनियनने (AWU) या निर्णयाला कडाडून विरोध केला. AWU हा Google कर्मचार्‍यांचा एक लहान पण उदयोन्मुख गट आहे, जो नोकर कपाती विरोधात आवाज उठवत आहे. युनियनचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे कंपनीचे कर्मचारी आणि क्षमता प्रभावित होतील. AWU च्या मते, Google ही जगातील सर्वात फायदेशीर कंपन्यांपैकी एक आहे, त्यामुळे ती सहजपणे कर्मचार्‍यांना कामावर ठेवू शकते.

अल्फाबेटने अलीकडेच मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची घोषणा केली, ज्यामुळे १२,००० कर्मचारी प्रभावित झाले. संपूर्ण जगात गुगलच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण ६ टक्के आहे. कंपनीचे CEO सुंदर पिचाई यांनी अनेकांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला, ते म्हणाले की "या बदलांचा Googlers च्या जीवनावर होणारा खरा परिणाम हा माझ्यावर मोठा भार आहे आणि ज्या निर्णयांनी आम्हाला येथे आणले त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो."

Google मध्ये नोकर कपातीची गरज नाहीअल्फाबेट वर्कर्स युनियनच्या (AWU) मते, या छाटणीमुळे खालच्या स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अधिक परिणाम होईल. त्याच वेळी, कार्यकारी आणि उच्च व्यवस्थापन स्तरावर त्याचा कमी परिणाम होईल. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार युनियनचा दावा आहे की गुगल ही जगातील सर्वात फायदेशीर कंपन्यांपैकी एक असल्याने नोकर कपात अनावश्यक आहे.

कोटींचा नफा होऊनही नोकर कपातAWU ने एका निवेदनात म्हटले आहे की अल्फाबेटच्या शीर्ष नेतृत्वाने टाळेबंदीची "संपूर्ण जबाबदारी" घेतली आहे, परंतु आता नोकऱ्या नसलेल्या १२,००० कामगारांसाठी ते पुरेसे नाही. केवळ गेल्या तिमाहीत १७ अब्ज डॉलर (सुमारे १.३७ लाख कोटी) नफा कमावलेल्या कंपनीसाठी हे अस्वीकार्य वर्तन आहे.

AWU ची मागणीएडब्ल्यूयूने नोकर कपातीसोबतच कंपनीच्या पारदर्शकतेच्या अभावावरही टीका केली. नोकर कपातीची आवश्यक का भासली आहे हे Google ने स्पष्ट केलेलं नाही, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. युनियनने Google ला त्यांची निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक खुली आणि पारदर्शक बनवण्याची आणि प्रभावित कर्मचार्‍यांना अधिक समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :गुगल