ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - गुगलने प्रतिस्पर्धी टेक्नॉलॉजी कंपनी अॅपलला मागे टाकत जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड म्हणून आपलं नाव कोरलं आहे. ब्रॅंड फायनान्स या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार 2017 मध्ये गुगल सर्वात विश्वासार्ह आणि मौल्यवान ब्रॅंड बनला आहे. ब्रॅंड फायनान्सनुसार गुगलची किंमत 109.4 अब्ज डॉलर (7,194 अब्ज कोटी रुपये) आहे.
वर्ष 2011 पासून अॅपल एक नंबरवर विराजमान होता. मात्र, यंदा गुगलने हे स्थान काबीज केलं. आकड्यांनुसार गुगलने मागील वर्षीच्या तुलनेत गुगलने 24 टक्क्यांनी वाढ मिळवली आहे.
अॅपलची ब्रॅंड व्हॅल्यू 145 अब्ज डॉलर होती यावर्षी ती 107 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. गेल्या वर्षी आयफोन 7 आणि 7 प्लस लाँन्च करुनही अॅपलची ब्रॅंड व्हॅल्यू कमी झाली. या सर्वेक्षणानुसार , तिसऱ्या स्थानावर अॅमेझॉन आहे, चौथ्या स्थानावर अॅटी अॅंड टी आहे, पाचव्या स्थानावर मायक्रोसॉफ्ट आणि सहाव्या स्थानावर सॅमसंग आहे.