Join us

Google Pay चं भारतीय युजर्सना मोठं गिफ्ट, 'अ‍ॅप'मध्ये नवीन अपडेट; फायदा जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 4:33 PM

Google नं आपल्या डिजिटल पेमेंट अ‍ॅप Gpay मध्ये एका नव्या भाषेचा सपोर्ट अ‍ॅड केला आहे.

नवी दिल्ली-

Google नं आपल्या डिजिटल पेमेंट अ‍ॅप Gpay मध्ये एका नव्या भाषेचा सपोर्ट अ‍ॅड केला आहे. UPI-बेस्ड Gpay मध्ये आता Hinglish भाषेला स्थान देण्यात आलं आहे. याबाबत कंपनीनं भारतात याआधीच घोषणा केली होती. अखेरीस हे नव अपडेट जारी करण्यात आलं आहे. 

Hinglish भाषेच्या सपोर्टसोबतच Google Pay मध्ये आता एकूण भाषांची संख्या १० झाली आहे. यात इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामीळ आणि तेलगु या भाषांचा समावेश आहे. आता जर तुम्हाला पेमेंट अ‍ॅपमध्ये भाषा बदलायची असेल तर नेमकं काय करावं लागणार ते जाणून घेऊयात...

सर्वात आधी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. जसं की Google Pay अ‍ॅप Apple App Store किंवा Google Play Store मधून लेटेस्ट व्हर्जन अपडेट करुन घ्यावं. त्यानंतर Google Pay अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये ओपन करा. अ‍ॅपमध्ये उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला प्रोफाइल आयकनवर क्लिक केल्यानंतर सेटिंग्जमध्ये जावं लागेल. पुढे Personal Info पर्यायावर क्लिक करा. यात तुम्हाला भाषा निवडीचा पर्याय दिसेल. इथून तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकता. 

भाषा निवडल्यानंतर तातडीनं तुमच्या Google Pay अ‍ॅपची भाषा बदलली जाईल आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेत व्यवहार करू शकता. आता 'गुगल पे'वर हिंदी आणि इंग्रजीसोबतच हिंग्लिश या भाषेचा वापर करू शकणार आहात. हिंग्लिश म्हणजे तुम्ही हिंदी वाक्य किंवा सूचना तुम्हाला इंग्रजी अद्याक्षरात दिसतील व टाइप करता येतील. 

टॅग्स :गुगल पेगुगलव्यवसाय