Join us  

Google Pay ची नवीन सर्व्हिस, आता डेबिट कार्डशिवाय UPI पिन सेट करू शकतील युजर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 3:52 PM

भारतात 400 कोरोडहून अधिक लोक डिजिटल पद्धतीने व्यवहार करतात, असे एका नवीन रिपोर्टमधून समोर आले आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही गुगल पे (Google Pay) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगल पेने आपल्या यूजर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI)  तुमचा आधार क्रमांक वापरून नव्याने सादर करण्यात आलेल्या सर्व्हिसमुळे UPI साठी रजिस्ट्रेशन करणे सोपे झाले आहे. गुगल पेच्यानुसार, आधार बेस्ड सर्व्हिस वापरून लाखो भारतीय युजर्सचे काम सोपे केले जाते. 

भारतात 400 कोरोडहून अधिक लोक डिजिटल पद्धतीने व्यवहार करतात, असे एका नवीन रिपोर्टमधून समोर आले आहे. भारतात किराणा, ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि टुरिज्म यासारख्या अनेक मोठ्या क्षेत्रांमध्ये 80 टक्क्यांहून अधिक व्यवहार ऑनलाइन केले जातात. याचबरोबर, PhonePe, Google Pay, Paytm आणि Cred चा UPI- आधारित पेमेंटमध्ये 95 टक्क्यांहून अधिक  बाजारातील हिस्सा आहे, असेही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. 

अलीकडील आधार आधारित UPI सर्व्हिससह, Google Pay युजर्स आता डेबिट कार्ड न वापरता आपला पिन सेट करू शकतील. सध्या ही सुविधा फक्त बँक खातेदारांसाठी उपलब्ध आहे. UIDAI च्या डेटानुसार, भारतातील 99.9 टक्क्यांहून अधिक वयस्क लोकांकडे आधार कार्ड आहे आणि ते महिन्यातून एकदा तरी त्याचा वापर करतात. आधार बेस्ड सर्व्हिसनंतर तुम्हाला एटीएम कार्डसह पिन सेट करण्यापासून सुटका मिळेल.

कसा करावा फीचरचा वापर?आधार बेस्ड UPI चा वापर करण्यासाठी तुम्हाला आधार आणि बँकेकडे आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आवश्यक असणार आहे. यानंतर युजर्स Google Pay वर डेबिट कार्ड किंवा आधार बेस्ड UPI अनबोर्डिंग यापैकी एक निवडण्यास सक्षम असतील. आधारचा पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे सुरुवातीचे 6 अंक प्रविष्ट करावे लागतील. यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्ही त्याचा वापर करू शकाल.

टॅग्स :गुगल पेव्यवसायतंत्रज्ञान