Lokmat Money > बिझनेस न्यूज > Google वर 5000 टक्क्यांपेक्षा जास्त 'हा' शब्द का सर्च करण्यात आला? जाणून घ्या...

Google वर 5000 टक्क्यांपेक्षा जास्त 'हा' शब्द का सर्च करण्यात आला? जाणून घ्या...

google : Google च्या मते ब्रेकआउटचा अर्थ असा आहे की एखादा शब्द 5000 टक्क्यांपेक्षा अधिक वेळा सर्च केला जाणे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 09:37 PM2021-08-10T21:37:46+5:302021-08-10T21:40:17+5:30

google : Google च्या मते ब्रेकआउटचा अर्थ असा आहे की एखादा शब्द 5000 टक्क्यांपेक्षा अधिक वेळा सर्च केला जाणे.

google search queries particular term rose by more than 5000 percent faang stocks know what | Google वर 5000 टक्क्यांपेक्षा जास्त 'हा' शब्द का सर्च करण्यात आला? जाणून घ्या...

Google वर 5000 टक्क्यांपेक्षा जास्त 'हा' शब्द का सर्च करण्यात आला? जाणून घ्या...

नवी दिल्ली : एखादी गोष्ट तुम्हाला माहित करुन घ्यायची असते, तर शक्यतो इंटरनेटवर Google ची मदत जाते. अनेकदा काही गोष्टी लोकांकडून सर्च केल्या जातात, ज्या की गुगल सर्चमध्ये टॉप लिस्टमध्ये येतात.  'ईयर इन सर्च' रिपोर्टनुसार कोरोना संकट काळात जगभरात 'कोरोना व्हायरस' सर्च लिस्टमध्ये सर्वात वरती म्हणजेच पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, एका शब्दाच्या सर्चमध्ये 5000% पेक्षा जास्त तेजी आढळून आली आहे. त्यामुळे हा शब्द  काही खास आहे, जाणून घ्या काय आहे, हा शब्द...

देशभरात शेअर बाजारांच्या वाढत्या चलनासोबत लोकांचाही त्याकडे अधिक कल निर्माण झाला आहे. दरम्यान 2020 च्या लॉकडाऊनमध्ये Google वर 'FAANG स्टॉक' या शब्दात ब्रेकआउट पाहायला मिळाला.

Google च्या मते ब्रेकआउटचा अर्थ असा आहे की एखादा शब्द 5000 टक्क्यांपेक्षा अधिक वेळा सर्च केला जाणे. FAANG ची लोकप्रियता इतकी वाढली की जगभरातील खासकरुन आशियातील लोक याबाबत अधिक माहिती करुन घेऊ इच्छित होते. FAANG अमेरिकेतील सर्वात मोठ्या लिस्टेड कंपन्यांनी मिळून बनलेले आहे आणि गुंतवणुकदारांमध्ये सर्वांत लोकप्रिय आहे.

जाणून घ्या, काय आहे FAANG?
अलीकडेच FAANG stocks जास्त लोकप्रिय झाला आहे. FAANG stocks चा वापर पाच सर्वात महत्त्वपूर्ण आणि टॉप कंपन्यांच्या शेअर्सना परिभाषित केला जातो.

F – Facebook (फेसबुक)
A – Amazon (अॅमेझॉन)
A – Apple (अॅप्पल)
N – Netflix (नेटफ्लिक्स)
G – Google (आता Alphabet Inc.च्या नावाने ओळखले जाते)

FAANG शब्दाचा वापर पहिल्यांदा 2013 मध्ये मॅड मनी जिम क्रेमरनी CNBC वरील कार्यक्रमात केला होता. क्रेमरनी सुरुवातीला FANG शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर Apple ची लोकप्रियता वाढल्यानंतर आणखी एक A यामध्ये जोडला गेला. त्यामुळे FANG चे FAANG झाले.

सर्वाधिक सर्च का झाला FAANG?
गेल्यावर्षी कोरोना संकट काळात अनेक लोक काम आणि मनोरंजन या गोष्टींसाठी सर्वाधिक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरच अवलंबून होते. या प्लॅटफॉर्म्सच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. Amazon Prime, Netflix सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सची मागणी वाढली. गुगल आणि फेसबुकवरही लोक अधिक वेळ घालवत होते. यानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली. गुंतवणुकदारांच्या वाढत्या संख्येने या कंपन्यांचे शेअर खरेदी करण्यास सुरुवात केली.

भारतात इतका लोकप्रिय का झाला FAANG?
या कंपन्यांची लोकप्रियता त्यावेळी पाहायला मिळाली जेव्हा अधिकतर भारतीय ब्रोकिंग फर्म्सनी विदेशी त अधिक सुविधा देण्यास सुरुवात केली. अर्थात ज्या भारतीय गुंतवणुकदारांचे प्रमुख ब्रोकिंग फर्मसह ट्रेडिंग खाते होते, ते अमेरिकन शेअर बाजारात लिस्टेड शेअर खरेदी करू शकत होते. ज्यात FAANG देखील समाविष्ट होते.

Web Title: google search queries particular term rose by more than 5000 percent faang stocks know what

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.