ब्रुसेल्स : गुगलच्या न्यूज अॅपवर बातम्या देण्याकरिता निवडक माध्यम समूहांना ती कंपनी येत्या तीन वर्षांत १ अब्ज डॉलरचा मोबदला देणार आहे. प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या माहितीचा गेली अनेक वर्षे गुगल सर्च इंजिनने अवैधरीत्या उपयोग केला, असा आरोप करण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर गुगलने हा वेगळा निर्णय घेतला आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांचे ब्लर्ब गुगलच्या न्यूज अॅपमध्ये दिसतील तसेच शुल्क भरून वाचायला मिळणारे काही लेख वाचकांना गुगल सर्चवर मोफत वाचायला मिळतील. या सगळ्यासाठी गुगल निवडक प्रसारमाध्यमांना मोबदला देणार आहे. गुगलने आपल्या या नव्या सेवेचा प्रारंभ गुरुवारी ब्राझील व जर्मनीमध्ये केला. त्यामध्ये गुगल न्यूज अॅपवर एखाद्या विषयाची बातमी तसेच त्या विषयाशी संबंधित इतर बातम्या, लेखांच्या लिंक असे सारे वाचकाला एकाच ठिकाणी पाहता येईल. तसेच ती बातमी देणाऱ्या वेबसाईटवरही थेट जाता येईल. या सुविधेमुळे बातमी वाचणाºयाला संबंधित विषयाची चौफेर माहिती मिळेल.
आणखी कंपन्यांशी करार करणार
च्गुगलचे उपाध्यक्ष ब्रॅड बेंडर यांनी सांगितले की, गुगलच्या न्यूज शोकेस प्रोग्रॅमसाठी ब्राझील, अर्जेंटिना, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, ब्रिटन आदी देशांतून २०० प्रसारमाध्यम समूहांनी गुगलशी करार केला आहे.
च्बातम्यांचे जाळे जसे वाढत जाईल तसतसे आणखी प्रसारमाध्यम समूहांशी गुगल करार करेल, असे सांगितले.