Make in India Google SmartPhone: जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात आपला व्यवसाय वाढवत आहेत. आधी apple ने भारतात iPhone ची निर्मिती सुरू केली होती. त्यानंतर आता जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलनेही आपला Google Pixal फोन भारतात तयार करण्याची घोषणा केली आहे. स्वतः गुगलचे सीईओ सुदर पिचाई यांनी ही माहिती दिली आहे. गुगलचा पहिला 'मेक इन इंडिया' फोन कधी लॉन्च होईल, जाणून घ्या...
अॅपलनंतर आता गुगल भारतात फोन तयार करणार आहे. याद्वारे भारत जगातील अनेक देशांना मागे टाकण्याच्या तयारीत आहे. याचे कारण म्हणजे, गुगल भारतात येईल, तेव्हा स्मार्टफोन बाजारपेठेतील शेअर्सची स्पर्धा त्रिकोणी होईल. यात Google, Apple आणि Samsung मध्ये स्पर्धा असेल. भारतात उत्पादन युनिट सुरू झाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल.
काय म्हणाले सुंदर पिचाई ?
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट करताना ही मोठी घोषणा केली आहे. त्यांनी लिहिले की, 'आम्ही भारतात पिक्सेल स्मार्टफोनचे स्थानिक पातळीवर उत्पादन सुरू करणार आहोत. पहिला डिव्हाइस 2024 मध्ये लॉन्च केला जाईल. भारताच्या डिजिटल वाढीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. आम्हालाही या विकासात भागीदार व्हायला आवडेल. याबद्दल आम्ही भारताचे पंतप्रधान आणि अश्विनी वैष्णव यांचेही आभार मानतो.'
We also introduced a more visual + local generative AI experience on Search to help surface AI-powered overviews on essential government programs, new Search features for small businesses, easier access to formal credit via Google Pay + more. https://t.co/wJ3Zx6oO6X
— Sundar Pichai (@sundarpichai) October 19, 2023
किंमत काय असेल?
गुगल पिक्सेलची किंमत काय असेल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. गुगल आणि सीईओ सुंदर पिचाई यांनी ही माहिती दिलेली नाही. अॅपल भारतात फोन असेंबल करत आहे, मात्र दरात कोणतीही कपात झालेली नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अॅपल अजूनही फोनचे भाग आयात करत आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, Google Pixel फक्त येथे असेंबल केला जाईल की, पूर्णपणे तयार केला जाईल. भारतातील Google Pixel च्या किमती त्याच आधारावर ठरवल्या जातील.
Google ची Apple शी स्पर्धा
2024 मध्ये Apple आणि Googl,e यांच्यात मोठी स्पर्धा सुरू होणार आहे. गुगल पिक्सेलची आयफोनशी लढत आहे. भारतातील बाजारपेठ मिळवण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा असेल. ज्याप्रमाणे अॅपलने भारतात एंट्री केली आहे, त्याचप्रमाणे गुगलही एंट्री करणार आहे.