Lokmat Money > बिझनेस न्यूज > आधी नकार दिला, आता Google ने खरेदी केली 'ही' कंपनी; तब्बल $32 अब्जांचा करार...

आधी नकार दिला, आता Google ने खरेदी केली 'ही' कंपनी; तब्बल $32 अब्जांचा करार...

गुगलच्या घोषणेनंतर पॅरेंट कंपनी Alphabet Inc. च्या शेअरमध्ये वाढ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 21:27 IST2025-03-18T21:25:17+5:302025-03-18T21:27:01+5:30

गुगलच्या घोषणेनंतर पॅरेंट कंपनी Alphabet Inc. च्या शेअरमध्ये वाढ झाली.

Google Wiz inc Deal : now Google buys 'this' company; deal worth $32 billion | आधी नकार दिला, आता Google ने खरेदी केली 'ही' कंपनी; तब्बल $32 अब्जांचा करार...

आधी नकार दिला, आता Google ने खरेदी केली 'ही' कंपनी; तब्बल $32 अब्जांचा करार...

Google Wiz Deal : आयटी/टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ने मंगळवारी(18 मार्च) सायबर सुरक्षा क्षेत्रातील मोठी कंपनी Wiz Inc. खरेदी करण्याची घोषणा केली आहे. हा करार तब्बल $32 अब्जमध्ये झाला असून, हा गुगलचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ऑल-कॅश करार मानला जात आहे. या कराराद्वारे Google ला त्यांचा Google Cloud व्यवसाय आणखी मजबूत करण्यात मोठी मदत मिळणार आहे.

हा करार विशेष का आहे?
गुगलच्या मते क्लाउड सुरक्षा सुधारण्यासाठी आणि मल्टी-क्लाउड तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, व्यवसाय आणि सरकारांकडे आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि मजबूत क्लाउड स्टोरेज आणि सुरक्षा उपाय असतील.

अल्फाबेट शेअर्समध्ये वाढ
या घोषणेनंतर Google ची मूळ कंपनी Alphabet Inc. च्या शेअर्समध्ये किंचित वाढ दिसून आली. प्री-मार्केट सत्रात कंपनीचा शेअर 0.07 टक्क्यांनी वाढून $164.34 वर व्यापार करत होता.

सुंदर पिचाई काय म्हणाले?
Google चे CEO सुंदर पिचाई म्हणाले, Google ने नेहमी सायबर सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. आज, व्यवसाय आणि सरकारांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित क्लाउड सोल्यूशन्स आणि मल्टी-क्लाउड पर्याय हवे आहेत. Google Cloud आणि Wiz एकत्रितपणे क्लाउड सुरक्षा एका नवीन स्तरावर नेतील.

2020 मध्ये कंपनीची स्थापना

सायबर सुरक्षा पुरवणाऱ्या Wiz Inc. कंपनीची स्थापना 2020 मध्ये झाली आणि कंपनीने खूप वेगाने विस्तार केला. यामध्ये Greenoaks, Sequoia Capital, Index Ventures, Insight Partners आणि Cyberstarts सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक होती. मे 2024 मध्ये विझचे मूल्य $12 अब्ज इतके होते.

आधी गुगलची ऑफर नाकारली 
Wiz CEO असाफ रॅपापोर्ट यांनी यापूर्वी Google ची ऑफर नाकारली होती. त्यांना आपल्या कंपनीद्वारे CrowdStrike आणि Palo Alto Networks सारख्या आघाडीच्या सायबरसुरक्षा कंपन्यांना आव्हान द्यायचे होते. याशिवाय, विझ आणि त्याच्या गुंतवणूकदारांना भीती वाटत होती की, टेक उद्योगातील आर्थिक छाननीमुळे हा करार दीर्घकाळ रखडला जाईल.

सरकार या करारावर लक्ष ठेवणार ?
गुगलला आधीपासूनच यूएस सरकारकडून विश्वासविरोधी चौकशीचा सामना करावा लागत आहे. गुगलने ऑनलाइन सर्च मार्केटमध्ये बेकायदेशीर मक्तेदारी निर्माण केल्याचा निर्णय नुकताच एका फेडरल न्यायाधीशाने दिला. याशिवाय गुगलवर डिजिटल जाहिरात व्यवसायाबाबतही खटला सुरू आहे. अशा परिस्थितीत विझचे संपादनदेखील छाननीच्या कक्षेत येऊ शकते.

Web Title: Google Wiz inc Deal : now Google buys 'this' company; deal worth $32 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.