बंगळुरू : देशातील ४00 रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत वायफाय सेवा लवकरच बंद होणार आहे. ही मोफत सेवा देणाऱ्या गुगलने हा निर्णय घेतला आहे. मात्र ती कधी बंद होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता मोबाइल कंपन्या अतिशय स्वस्त दरात इंटरनेट डेटा देत आहेत. त्यामुळे आता आम्हाला रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्याची गरजच राहिलेली नाही, असे गुगलने म्हटले आहे.
गुगलने पाच वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुरु केली होती. २0२0 पर्यंत देशातील ४00 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याच्या दोन वर्षे आधी म्हणजे २0१८ सालीच सर्व ४00 स्थानकांवर ही मोफत सेवा सुरू झाली, असे गुगलचे उपाध्यक्ष सीझर सेनगुप्ता यांनी िसांगितले. सध्या अन्य कंपन्याही अशी मोफत वायफाय सेवा रेल्वे स्थानकांवर तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी देत आहेत. रेलटेलची सेवा सुरूचमात्र भारतातील ५५00 पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर रेलटेलची मोफत वायफाय सेवा आजही उपलब्ध आहे आणि यापुढेही ती सुरूच राहणार आहे. त्यामुळे गुगलने आपली मोफत सेवा बंद केल्याचा परिणाम होणार नाही, असे सांगण्यात येत आहे.