Join us

भारतीय महिलांच्या छोट्या स्टार्टअपसाठी गुगलची मोठी घोषणा, ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 4:20 PM

गुगल इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुगल आता ७५ हजार कोटींच्या भारत डिजिटायजेशन फंडच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रीत करणार

गुगल इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुगल आता ७५ हजार कोटींच्या भारत डिजिटायजेशन फंडच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. कंपनीनं इंटरनेट स्वस्त करण्यासाठी २०२० मध्ये १० बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ७५ हजार कोटींची गुंतवणूक केली होती. गुगल इंडिया डिजिटायजेशन फंडच्या माध्यमातून कंपनीनं जिओमध्ये ७.७३ टक्के भागीदारी ४.५ बिलियन डॉलर आणि भारती एअरटेलमध्ये १.२ टक्के वाटा ७०० मिलियन डॉलरमध्ये खरेदी केला होता. 

गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि वी.पी.संजय गुप्ता यांनी सांगितलं की, आयडीएफ गुंतवणुकीच्या स्वरुपात महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपवर विशेष लक्ष देण्यासोबतच छोट्या कंपन्यांना पाठिंबा देणार आहे. 

नव्या प्रकल्पांची घोषणाकंपनीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऑपरेट केल्या जाणाऱ्या प्रकल्पांची घोषणा केली. यात स्पीच टेक्नोलॉजी, वॉइस आणि व्हिडिओ सर्च इत्यादींचा समावेश आहे. एआयसोबतच टेक्स्ट कंटेंट तातडीनं व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट केला जाऊ शकतो. इंग्रजीतून इतर कोणत्याही भाषेत भाषांतर सहजपणे शक्य आहे.

मद्रासमध्ये AI सेंटरसाठी १ मिलियन डॉलरच्या ग्रांटची घोषणाकंपनीने भारतातील ७७३ जिल्ह्यांतील स्पीच डेटा संकलित करण्यासाठी बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्ससोबत सहयोगाची घोषणा केली आहे. Google ने IIT मद्रास येथे भारतातील पहिले AI केंद्र स्थापन करण्यासाठी १ दशलक्ष डॉलर अनुदानाची घोषणा केली आहे. 

टॅग्स :गुगल