Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुगलची रिलायन्स Jio सोबत 7.7 % भागिदारी, हजारो कोटींची गुंतवणूक

गुगलची रिलायन्स Jio सोबत 7.7 % भागिदारी, हजारो कोटींची गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी बुधवारी कंपनीच्या 43 व्या सर्वसाधारण सभेत रिलायन्स जिओ आणि गुगलच्या भागिदारीची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 03:36 PM2020-07-15T15:36:41+5:302020-07-15T15:37:04+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी बुधवारी कंपनीच्या 43 व्या सर्वसाधारण सभेत रिलायन्स जिओ आणि गुगलच्या भागिदारीची घोषणा केली.

Google's partnership with Reliance Jio will invest Rs 33,000 crore, mukesh ambani | गुगलची रिलायन्स Jio सोबत 7.7 % भागिदारी, हजारो कोटींची गुंतवणूक

गुगलची रिलायन्स Jio सोबत 7.7 % भागिदारी, हजारो कोटींची गुंतवणूक

Highlightsरिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी बुधवारी कंपनीच्या 43 व्या सर्वसाधारण सभेत रिलायन्स जिओ आणि गुगलच्या भागिदारीची घोषणा केली.

मुंबई - कोरोनाच्या साथीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला असला तरी येथील बाजारपेठेबद्दल गुंतवणूकदारांमध्ये असलेले आकर्षण जराही कमी झालेले नाही. आयटी क्षेत्रातील गुगल ही बलाढ्य कंपनी भारतामध्ये १० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली आहे. त्यानंतर, गुगलकडून रिलायन्स जिओमध्येही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी बुधवारी कंपनीच्या 43 व्या सर्वसाधारण सभेत रिलायन्स जिओ आणि गुगलच्या भागिदारीची घोषणा केली. गुगलकडून 7.7 टक्के भागिदारीसाठी रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. यापूर्वी फेसबुकने जिओसोबत 9.99 टक्क्यांची भागिदारी म्हणून 44 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी यांनी आत्तापर्यंत जिओची भागिदारी विकून तब्बल 1.18 लाख कोटी रुपये कमावले आहेत. 

गुगल कंपनीचा गुगल फॉर इंडिया हा व्यावसायिक प्रकल्प असून त्या अंतर्गत ही गुंतवणूक केली जाणार आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितले की, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गुगलने या देशात इतकी मोठी गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाबद्दलच्या धोरणामुळे गुगल कंपनीला मोठे पाठबळ मिळाले आहे. सुंदर पिचाई हे भारतवंशीय असून गुगलसारख्या बलाढ्य कंपनीच्या सीइओपदी त्यांच्या झालेल्या नियुक्तीने देशात सर्वांनाच अभिमान वाटला होता.

इकॉनॉमिक्स टाइम्सशी बोलताना पिचई यांना जिओ प्लॅटफॉर्ममधील गुंतवणुकीसंदर्भात विचारणा केली, त्यावेळी पिचई यांनी होकार दिला नाही, पण नकारही दिला नाही. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानीची कंपनी जिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये गुगलकडून 4 अब्ज डॉलर म्हणजे 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीची शक्यता आहे. याबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. गुगलने आत्तापर्यंत 1.18 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून जिओच्या गुंतवणुकीवर अखेरचं शिक्कामोर्तब झाल्यास, फेसबुकनंतर गुगलच सर्वाधिक भागिदारी असलेली कंपनी ठरणार आहे. फेसबुकने जिओसोबत 9.99 टक्क्यांची भागिदारी म्हणून 44 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी यांनी आत्तापर्यंत जिओची भागिदारी विकून तब्बल 1.18 लाख कोटी रुपये कमावले आहेत. 

Web Title: Google's partnership with Reliance Jio will invest Rs 33,000 crore, mukesh ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.