नवी दिल्ली - सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलकडून पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा कमालीच्या लोकप्रिय आहेत. दरम्यान, या सेवांपैकी एक सेवा बंद करण्याचा निर्णय गुगलकडून घेण्यात आला आहे. गुगलने गुगल (Google) प्ले म्युझिक ही सेवा बंद करण्याची औपचारिक घोषणा ५ डिसेंबर २०२० रोजी केली होती. मात्र गुगलच्या एका रिपोर्टनुसार येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत युझर्सकडे या सेवेमधील आपला डेटा डाऊनलोड, ट्रान्सफर आणि डिलीट करण्याची संधी असेल. असे न केल्यास हा डेटा आपोआप डिलीट होईल. (Google Play Music service will be discontinued )
गुगल आपल्या प्ले म्युझिक अॅपला यूट्युब म्युझिक अॅपच्या माध्यमातून रिप्लेस करणार आहे. कंपनीकडून याबाबतची घोषणा गतवर्षी करण्यात आली होती. त्यामुळे जर तुम्हीसुद्धा गुगल प्ले म्युझिक अॅपवरून आवडीची गाणी ऐकत असाल आणि ती कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवू इच्छित असाल तर गुगलने यूट्युब म्युझिकवर ही गाणी ट्रान्सफर करण्याची संधी दिली आहे. गुगलचे म्हणणे आहे की, २४ फेब्रुवारीच्या आधी हे म्युझिक ट्रान्सफर करून घ्या.
दरम्यान, गुगलने याबाबत युझर्सना ईमेल करण्यास सुरुवात केली आहे. आता जर तुम्ही सुद्धा आपला डेटा यूट्यूब म्युझिकवर ट्रान्सफर करू इच्छित असाल तर त्यासाठी काही सोप्या स्टेप्स उपलब्ध आहेत.
त्यासाठी सर्वप्रथम music.google.com किंवा अँड्रॉइड किवा iOS अॅपवर जा. त्यानंतर इथे Transfer to Youtube हा पर्याय मिळेल. त्यावर टॅप करा.
युझर्सला त्यानंतर यूट्युब म्युझिकवर रिडायरेक्ट करण्यात येईल. जिथे ट्रान्सफर सुरू होईल. ट्रान्सफर होणाऱ्या फाइलमध्ये प्लेलिस्ट, गाणी, अल्बम, लाइक्स आणि अपलोड पर्चेस आणि बिलिंगची माहिती मिळेल.
इथे ‘manage your music’ चा पर्याय मिळेल. युझर म्युझिक डायब्रेरीला डाऊनलोड, रिकमेंडेशन हिस्ट्रीला डिलीट किंवा पूर्ण गुगल प्ले म्युझिक लायब्रेरीला रिमुव्ह करू शकते.
जर तुम्ही ‘Download your music library’ चा पर्याय निवडला तर तुम्हाला Google Takeout वर रिडायरेक्ट केले जाईल. येथून युझर गुगल प्ले म्युझिक डेटाी कॉपी एक्सपोर्ट करू शकतील.