Lokmat Money > बिझनेस न्यूज > Amazon-Flipkart वरुन तुमच्यासोबत फ्रॉड झाला तर? फक्त 'हे' काम करा, एका झटक्यात मिळेल नुकसानभरपाई

Amazon-Flipkart वरुन तुमच्यासोबत फ्रॉड झाला तर? फक्त 'हे' काम करा, एका झटक्यात मिळेल नुकसानभरपाई

Amazon Flipkart Sale: ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनेकवेळा ग्राहक फ्रॉडला बळी पडतात. अलीकडेच एका व्यक्तीने १ लाख रुपयांचा टीव्ही ऑर्डर केला होता. पॅकेज उघडल्यावर त्यात दुसऱ्याच ब्रँडचा टीव्ही पाठवण्यात आला होता. अशा परिस्थितीत तुम्ही कधी अडकलात तर काय करावे? हे माहिती हवे.

By राहुल पुंडे | Published: September 26, 2024 11:32 AM2024-09-26T11:32:48+5:302024-09-26T11:33:42+5:30

Amazon Flipkart Sale: ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनेकवेळा ग्राहक फ्रॉडला बळी पडतात. अलीकडेच एका व्यक्तीने १ लाख रुपयांचा टीव्ही ऑर्डर केला होता. पॅकेज उघडल्यावर त्यात दुसऱ्याच ब्रँडचा टीव्ही पाठवण्यात आला होता. अशा परिस्थितीत तुम्ही कधी अडकलात तर काय करावे? हे माहिती हवे.

got a fake product from amazon flipkart here what you can do to get refund | Amazon-Flipkart वरुन तुमच्यासोबत फ्रॉड झाला तर? फक्त 'हे' काम करा, एका झटक्यात मिळेल नुकसानभरपाई

Amazon-Flipkart वरुन तुमच्यासोबत फ्रॉड झाला तर? फक्त 'हे' काम करा, एका झटक्यात मिळेल नुकसानभरपाई

Amazon Flipkart Sale : ऑनलाईन शॉपिंगची वाढती क्रेझ पाहता ई कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेस्टीवर सिझन आणत असतात. उद्यापासून (२७ सप्टेंबर) फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज’ आणि अ‍ॅमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’ची सुरुवात होत आहे. या सेलमध्ये जवळपास प्रत्येक प्रॉडक्टवर बंपर सूट देण्यात येते. ग्राहकही या सेल्सची वर्षभर वाट पाहत असतात. Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी करणे खूप सोपे आहे. पण, कधीकधी ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकांसोबत फ्रॉड झाल्याचीही उदाहरणे आहेत. अशावेळी युजर्सना मनस्ताप सहन करावा लागतो. तुम्हाला यातून सुटका करुन घ्यायची असेल तर काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

फेक प्रॉडक्ट डिलिव्हर झाले तर काय करावे?
हा प्रकार तुमच्यासोबत घडूच नये असं वाटत असेल तर तुम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकता. अनेक ऑनलाईन शॉपिंग कंपन्या ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय देतात. या पर्यायासह खरेदी केलेली उत्पादने डिलिव्हरीपूर्वी अनबॉक्स केली जातात. मात्र, हा पर्याय निवडल्यानंतरही तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायल्या हव्यात.

अनबॉक्सिंगचा Video शूट करा
ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय घेतला तरीही अनबॉक्स करताना त्याचा व्हिडीओ शूट करणे कधीही सुरक्षित आहे. जर तुम्हाला चुकून बनावट उत्पादन मिळाले तर तुम्हाला रिटर्न करण्यात अडचण येणार नाही. फोटो घेण्यापेक्षा व्हिडीओ रेकॉर्ड करणे अधिक चांगला पर्याय आहे. 

कस्टमर केअरशी संपर्क करा
तुम्हाला मिळालेलं प्रॉडक्ट डिफेक्टीव किंवा फेक असेल तर तात्काळ तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी केली असेल त्या ग्राहक सेवांशी संपर्क साधावा. यासाठी तुम्हाला त्या ॲप किंवा वेबसाइटवर लॉगिन करावे लागेल. तिथे जाऊन तुमची तक्रार नोंदवावी लागेल. आपण ईमेलद्वारे देखील आपलं म्हणणं कंपनीपर्यंत पोहचवू शकतो. पुरावा म्हणून तुम्ही शूट केलेला व्हिडिओ शेअर करा.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर
अनेकदा असा अनुभव येतो, की कस्टमर केअर किंवा कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. अशावेळी तुम्ही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करू शकता. वेगवेगळ्या सोशल मीडियावर अकाउंट असलेल्या कंपन्यांना टॅग करुन तुमची तक्रार पोस्ट करा. सोशल इमेजला धक्का पोहचू नये यासाठी कंपन्या लगेच प्रतिसाद देतात. एवढे करूनही जर तुमची समस्या सुटली नाही तर तुम्ही ग्राहक मंचाकडे धाव घेऊ शकता.

ग्राहक मंचाकडे तक्रार करा
सरकारने लोकांना मदत करण्यासाठी अनेक पर्याय दिले आहेत. तुम्ही https://consumerhelpline.gov.in/ वर जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. किंवा तुम्ही थेट ग्राहक मंचाच्या फोन क्रमांकावर तक्रार करू शकता. ही सुविधा एसएमएस, एनसीएच ॲप आणि उमंग ॲपवरही उपलब्ध आहे. यावर तक्रार करण्यासाठी, तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नंतर तुमची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. तुम्ही तुमच्या तक्रारीचा फॉलोअप देखील घेऊ शकता.

Web Title: got a fake product from amazon flipkart here what you can do to get refund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.