Join us

दिवाळीत भेटवस्तू स्वीकारणार आहात? किती टॅक्स भरावा लागणार ते पाहा; अन्यथा गोत्यात याल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 6:20 AM

सणासुदीच्या दिवसांत विशेषत: दिवाळीमध्ये बाजारात भेटवस्तूंची रेलचेल असते. परस्परांना भेटवस्तू देण्याचे प्रमाणही प्रचंड असते. त्यात मग भेटकार्ड, मिठाई, सुका मेवा यांपासून दागिने, रोख रक्कम, मौल्यवान चीजवस्तूंपर्यंतचा समावेश असतो.

लोकमत न्यूज नेटवर्क : सणासुदीच्या दिवसांत विशेषत: दिवाळीमध्ये बाजारात भेटवस्तूंची रेलचेल असते. परस्परांना भेटवस्तू देण्याचे प्रमाणही प्रचंड असते. त्यात मग भेटकार्ड, मिठाई, सुका मेवा यांपासून दागिने, रोख रक्कम, मौल्यवान चीजवस्तूंपर्यंतचा समावेश असतो. परंतु या मौल्यवान भेटवस्तू स्वीकारताना सावध रहायला हवे. का? पाहू या...नातेवाइकांकडून भेटवस्तू मिळाल्यास?पती, पत्नी, भाऊ, बहीण, आई-वडील यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू करमुक्त आहेत. आई-वडिलांकडून १ लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली तर त्यावरही कर आकारणी केली जाऊ शकत नाही. स्थावर मालमत्ता, भेट मिळाल्यास?एखाद्याकडून स्थावर मालमत्ता भेट म्हणून मिळते त्यावेळी कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही. फक्त त्या मालमत्तेच्या मालकीसाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मात्र, भरलेली स्टॅम्प ड्युटी मालमत्तेची किंमत समजून त्यावर करआकारणी केली जाते.काय सांगतो नियम?पाच हजारांहून अधिक मूल्याचे गिफ्ट व्हाऊचर तुमच्या वेतनाचा भाग समजला जातो आणि त्यानुसार त्यावर प्राप्तिकर आकारला जातो. तसेच तुमच्या बँक खात्यात परस्पर बोनसची रक्कम जमा झाली तर तीही करपात्र ठरते. रोख रकमेत बोनस मिळाल्यास त्याची पोचपावती राखून ठेवावी. प्राप्तिकर विवरणपत्र भरताना त्याचा उल्लेख करावा. ५००० रुपयेच भेटवस्तू वा बोनसची वित्तीय वर्षातील मर्यादाकरमुक्त भेटवस्तू हवी असल्यास या मर्यादेखालील रकमेचा स्वीकार करावा.मित्रपरिवाराकडून भेटवस्तू मिळाल्यास काय?मित्र किंवा नातेवाइकांव्यतिरिक्त अन्य कोणाकडूनही ५० हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तूंचा स्वीकार करता येतो. त्यावर कर आकारणी केली जाऊ शकत नाही. ५० हजारांवर एक रुपयाही अधिक झाल्यास संपूर्ण रकमेवर कर आकारला जातो. समजा तीन जणांकडून तुम्हाला जर ५५ हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू मिळाल्या तर त्यावरही कर आकारणी होईल.

टॅग्स :दिवाळी 2021