Lokmat Money > बिझनेस न्यूज > नवी किंवा जुनी कर प्रणाली निवडण्यासाठी मेल आलाय? सिलेक्ट करण्यापूर्वी पाहा कोणती आहे बेस्ट

नवी किंवा जुनी कर प्रणाली निवडण्यासाठी मेल आलाय? सिलेक्ट करण्यापूर्वी पाहा कोणती आहे बेस्ट

कंपन्या कर्मचाऱ्यांना ईमेल करून यासंदर्भात विचारणा करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 10:49 AM2023-04-19T10:49:49+5:302023-04-19T10:50:47+5:30

कंपन्या कर्मचाऱ्यांना ईमेल करून यासंदर्भात विचारणा करत आहेत.

Got mail to choose new or old tax regime Before selecting see which one is best know details | नवी किंवा जुनी कर प्रणाली निवडण्यासाठी मेल आलाय? सिलेक्ट करण्यापूर्वी पाहा कोणती आहे बेस्ट

नवी किंवा जुनी कर प्रणाली निवडण्यासाठी मेल आलाय? सिलेक्ट करण्यापूर्वी पाहा कोणती आहे बेस्ट

आयकर विभागानं कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांना नवीन (New or Old Tax Regime) किंवा जुन्या कर प्रणालीची निवड करायची आहे का हे विचारण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर, पगारातून टीडीएस कापून कापावा लागेल. त्यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांना ईमेल करून यासंदर्भात विचारणा करत आहेत.

ईमेलला उत्तर दिलं नाही तर?
तुम्ही ई-मेलला प्रतिसाद न दिल्यास, नवीन कर व्यवस्था आपोआप लागू होईल. त्यानुसार तुमचे कर दायित्व ठरवले जाईल.

कायम तिच कर प्रणाली लागू राहिल?
नाही. तुम्ही सुरुवातीला नवीन कर प्रणालीची निवड केल्यास, तुम्ही आर्थिक वर्षाच्या शेवटी पुन्हा जुन्या कर प्रणालीचा विचार करू शकता. तुम्ही दरवर्षी कोणतीही कर प्रणाली निवडू शकता.

कोणती कर प्रणाली योग्य?
जर तुमचा वार्षिक पगार सात लाखांपर्यंत असेल आणि तुम्ही कोणत्याही बचतीत गुंतवणूक करत नसाल, तर तुम्ही नवीन कर प्रणालीचा अवलंब करू शकता. ७ लाख आणि त्याहून अधिक अतिरिक्त किरकोळ उत्पन्नावर कोणताही कर नाही. जर तुम्ही वेगवेगळ्या बचत योजनांमध्ये करसवलत मिळवण्यासाठी गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही जुनी कर व्यवस्था निवडू शकता.

Web Title: Got mail to choose new or old tax regime Before selecting see which one is best know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.