Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकारनं मुंलींना दिलं मोठं गिफ्ट! सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज वाढले, जाणून घ्या नवीन दर

मोदी सरकारनं मुंलींना दिलं मोठं गिफ्ट! सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज वाढले, जाणून घ्या नवीन दर

तुम्ही जर सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 07:07 PM2023-03-31T19:07:26+5:302023-03-31T19:08:06+5:30

तुम्ही जर सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

gov hiked interest rate on sukanya samriddhi yojana | मोदी सरकारनं मुंलींना दिलं मोठं गिफ्ट! सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज वाढले, जाणून घ्या नवीन दर

मोदी सरकारनं मुंलींना दिलं मोठं गिफ्ट! सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज वाढले, जाणून घ्या नवीन दर

तुम्ही जर सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने मुलींसाठी मोठं गिफ्ट जाहीर केलं आहे.  या योजनेसाठी सरकारने व्याजदरात वाढ केली आहे. सरकार दर तिमाहीसाठी लघु बचत योजनांवर व्याजदर जाहीर करते. शुक्रवारी, सरकारने एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीचे व्याजदर जाहीर केले. सरकारने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचे दर वाढवले ​​आहेत. या योजनेत व्याजदरात ०.४० टक्के वाढ करण्यात आली आहे. यावेळी या योजनेत ७.६ टक्के व्याजदर उपलब्ध होता. आता ते ८ टक्के करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने बेटी पढाओ, बेटी बचाओ योजनेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींचे भविष्य सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही दीर्घकालीन बचत योजना आहे. या योजनेत पालक आपल्या मुलींच्या नावावर गुंतवणूक करतात. ही सरकारी योजना आहे, त्यामुळे त्यात कोणताही धोका नाही. या योजनेत हमी परतावा उपलब्ध आहे.

मोदी सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, स्मॉल सेविंग स्कीमवरील व्याज ०.७० टक्क्यांनी वाढवलं!

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीसाठी आयकर सवलत देखील उपलब्ध आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, या योजनेतील गुंतवणुकीवर १.५० लाख रुपयांची कर सवलत उपलब्ध आहे. ही योजना EEE दर्जासह येते. म्हणजेच, या योजनेत गुंतवणूक, व्याज उत्पन्न आणि परिपक्वता रक्कम या तिन्ही करमुक्त आहेत.

सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या वयाची १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते उघडले जाते.या योजनेत कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींचे खाते उघडता येते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मुलीच्या लग्नासाठी आणि उच्च शिक्षणासाठी चांगला फंड तयार करू शकता.

Web Title: gov hiked interest rate on sukanya samriddhi yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.