Join us

PFवरच्या व्याजदराची सरकारकडून घोषणा, आता एवढी होणार बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:05 PM

केंद्र सरकारनं जानेवारी-मार्चच्या तिमाहीत जनरल प्रॉव्हिडंट फंडा(GPF)वर मिळणाऱ्या व्याजदराची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारनं जानेवारी-मार्चच्या तिमाहीत जनरल प्रॉव्हिडंट फंडा(GPF)वर मिळणाऱ्या व्याजदराची घोषणा केली केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागानं गेल्या काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी करून माहिती दिली आहे.जानेवारी ते मार्च 2020साठी GPFवर 7.9 टक्के व्याज मिळणार आहे.

नवी दिल्लीः केंद्र सरकारनं जानेवारी-मार्चच्या तिमाहीत जनरल प्रॉव्हिडंट फंडा(GPF)वर मिळणाऱ्या व्याजदराची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागानं गेल्या काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी करून माहिती दिली आहे. जानेवारी ते मार्च 2020साठी GPFवर 7.9 टक्के व्याज मिळणार आहे. कार्मिक, लोकसंख्या आणि पेन्शन मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, एक वर्ष पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगार, निवृत्तीनंतर पुन्हा कामावर रुजू झालेले आणि सरकारी कर्मचारी कर्मचारी जनरल प्रॉव्हिडंट फंड नियम 1960अंतर्गत येतात. पेन्शन सुरू होण्याच्या तीन महिन्यांपूर्वीच या प्रॉव्हिडंट फंडचं सब्सक्रिप्शन बंद केलं जातं. इतर छोट्या योजनांवरचे व्याजदर बदललेपोस्टातल्या छोट्या बचत योजनांववरचे व्याजदर जानेवारी ते मार्च या काळात स्थिर ठेवण्यात आले होते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(NSC) अशा छोट्या बचत योजनांसाठी जानेवारी ते मार्च 2020 या तिमाहीसाठी व्याजदर 7.9 टक्के निश्चित करण्यात आले आहेत. 

या योजनांवरच्या व्याजदरात केले बदल1. जनरल प्रॉव्हिडंट फंड सेंट्रल सर्व्हिसेस

2. काँट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड

3. ऑल इंडिया सर्व्हिस प्रॉव्हिडंट फंड

4. स्टेट रेल्वे प्रॉव्हिडंट फंड

5. जनरल प्रॉव्हिडंट फंड डिफेन्स सर्व्हिसेस

6. इंडियन ऑर्डिनन्स डिपार्टमेंट प्रॉव्हिडंट फंड

7. इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीज वर्कमेन्स प्रॉव्हिडंट फंड

8. इंडियन नेवल डॉकयार्ड वर्कमेन्स प्रॉव्हिडंट फंड

9. डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड

10. आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रॉव्हिडंट फंड

टॅग्स :पैसा