Join us

सरकारनं २० रुपयांच्या लायटरच्या इम्पोर्टवर घातली बंदी, काय आहे या मागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 4:09 PM

२० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या लाइटर्सवर बंदी घालण्यात यावी, असं सरकारनं अधिसूचना जारी करत म्हटलंय.

सरकारनं २० रुपयांच्या सिगारेट लायटरच्या आयातीवर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सिगारेट पिणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. याच्या आयातीवर बंदी घालण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय. २० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या लाइटर्सवर बंदी घालण्यात यावी, असं सरकारनं अधिसूचना जारी करत म्हटलंय.

सरकारने हा निर्णय आयातीला आळा घालण्यासाठी घेतला आहे. २० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या लाईटर्सवरील आयात शुल्काची श्रेणी मोफत वरून काढून टाकत ते 'बंदी'च्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. मात्र, जर सीआयएफ म्हणजेच लायटरची किंमत, विमा आणि मालवाहतूक २० रुपयांपेक्षा जास्त असेल तर हे लायटर आयात केले जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात आयात केलेल्या वस्तूंचे एकूण मूल्य निर्धारित करण्यासाठी सीआयएफ मूल्य वापरलं जाते.

काय आहे आयातीचं गणित?२०२२-२३ या आर्थिक वर्षात पॉकेट किंवा गॅस लाइटरची आयात ६.६ लाख डॉलर्स म्हणजे सुमारे ५.४१ कोटी रुपये होती. चालू आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये ते १.३ लाख डॉलर्स म्हणजेच १.०६ कोटी रुपये होते. हे प्रामुख्याने स्पेन, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरातीमधून आयात केले जातात.

दुसरीकडे, रिफिलेबल लायटरची आयात २०२१-२२ मध्ये ७० लाख डॉलर्स म्हणजेच ५७.४३ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये ८८ लाख डॉलर्स म्हणजेच ७२.२० कोटी होती.

टॅग्स :सरकारव्यवसाय