लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: २०२४-२५ मध्ये पहिल्या सहा महिन्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना तब्बल ८५,५२० कोटी रुपयांचा घसघशीत नफा झाला आहे. मागील वर्षाच्या याच समान कालावधीच्या तुलनेत बँकांनी ६७,८५० कोटी रुपयांचा नफा कमावला होता. त्यात २६ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली. उत्तम कर्जवसुली आणि बँकांची एकूणच क्षमता वाढल्याने नफ्यात वाढ झाल्याचे दिसत आहे. अलीकडे लागू करण्यात आलेल्या बँक सुधारणा आणि एनहान्स्ड अॅक्सेस अँड सर्व्हिस एक्सेलन्स फ्रेमवर्क यंत्रणेचे यात मोठे योगदान आहे.
बँका किरकोळ, एमएसएमई आणि पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना पतपुरवठा करून अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
गेल्यावर्षीचा विक्रम मागे पडणार
सार्वजनिक क्षेत्रातील बँका गेल्या वर्षीचा १.४६ लाख कोटी रुपयांचा नफा मागे टाकू शकतात. बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले की, मजबूत पायाभूत सुविधांमुळे सरकारी बँका पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यात भूमिका बजावण्यास तयार आहेत.
नफा कशामुळे वाढला?
नफ्यातील ही वाढ प्रशासनामुळे झाली आहे. सरकारने सर्वोच्च व्यवस्थापनाच्या निवडीमध्ये निष्पक्षता निश्चित केली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांसाठी गैर-कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली आहे आणि भरतीद्वारे प्रमुख नेतृत्व पदे भरली आहेत. भांडवलात वाढ झाल्याने बँकांची जोखीम घेण्याची क्षमताही वाढली आहे. भाड्यालात वाढ झाल्याने बँकाची जाण्याची क्षमताही वाढली आ करून शेअर होल्डिंग मूल्यात वाढ नोंदवली आहे. बँकांच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सकल नॉन-परफॉर्मिंग अॅसेट मार्च २०१८ मध्ये १४.५८ टक्के इतके होते. सप्टेंबर २९१४ मध्ये त्यात ३.१२ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.