Join us

सरकारने एनपीएस बाबतच्या नियमात बदल केला; १ फेब्रुवारीपासून लागू होणार नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 4:40 PM

सरकारने एनपीएसच्या नियमात बदल केले असून नवीन नियम १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहेत.

सरकारने एनपीएसच्या नियमात बदल केले असून नवीन नियम १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत पैसे काढण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत, एनपीएसच्या नवीन नियमांनुसार, आता कोणीही एनपीएस खात्यातून २५ टक्क्यांहून अधिक रक्कम काढू शकत नाही. या रकमेत मालक आणि कर्मचारी या दोघांच्याही पैशांचा समावेश असेल. हे बदल १ फेब्रुवारी पासून होणार आहेत. 

एनपीएस सदस्य गुंतवणुकीच्या काळात तीनवेळा पैसे काढू शकतात. जर तुम्हाला आंशिक रक्कम काढायची असेल तर ग्राहकांना कमीत कमी तीन  वर्षापर्यंत गुंतवणूक असायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही २५ टक्के रक्कम तीन वर्षानंतर काढू शकता. ही रक्कम मुलांचे शिक्षण, लग्न, घर बांधकाम, रुग्णालय खर्च या कामांसाठी वापरु शकता.

"मला हे बोलताना दु:ख होतंय...," Vodafone Idea बाबत Airtel चे सुनील मित्तल असं का म्हणाले?

रक्कम कधी काढता येईल? 

 मुलांच्या उच्च शिक्षणासाठी 

मुलांच्या लग्नासाठीही 

तुम्ही गृहखरेदी, गृहकर्जाची परतफेड आणि इतरांसाठीही पैसे काढू शकता. 

तसेच गंभीर आजार, उपचार आणि इतर वैद्यकीय खर्चासाठी देखील काढता येते. 

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतही २५ टक्के रक्कम काढता येते. 

ही रक्कम कोणत्याही प्रकारचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. 

इतर अटी

पैसे काढण्यासाठी तुम्हाला खाते उघडल्यापासून तीन वर्षांसाठी सदस्य असणे आवश्यक आहे. 

या खात्यातून २५ टक्क्यांहून अधिक अंशतः पैसे काढता येत नाहीत. 

एनपीएस खातेधारकांना खात्यातून जास्तीत जास्त तीन वेळा आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे.

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी नुसार, वयाच्या ६० वर्षांनंतर एकूण मॅच्युरिटी रकमेच्या ६० टक्के रक्कम NPS मधून एकरकमी काढण्याची परवानगी आहे, जी करमुक्त आहे.

मॅच्युरिटी रकमेच्या उर्वरित ४० टक्के रक्कम एखाद्याला अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवावी लागते, ज्यातून पेन्शन मिळते. अॅन्युइटीमध्ये गुंतवलेली रक्कम करमुक्त आहे, पण वार्षिकी अंतर्गत परतावा म्हणून मिळालेल्या पेन्शनच्या रकमेवर कोणतीही कर सूट नाही. करदात्याला कर स्लॅबनुसार कर भरावा लागतो. 

टॅग्स :गुंतवणूक