जगाव : तुरदाळीचे गगणाला भिडलेले भाव व त्यात दररोज सरकारच्या वेगवेगळ्या घोषणांमुळे तूर दाळीला ग्राहकी नसल्याने दाळ पडून आहे. भाव कमी होतील या आशेने दाळीची विक्री पाच टक्क्यांवर आली असून ग्राहकांसोबतच विक्रेतेही दाळ खरेदी करीत नसल्याने दाळ बाजारात अस्थिरता पसरली आहे. गेल्या महिन्यात तुरदाळीच्या भावात दररोज वाढ होऊन ती २१० रुपये प्रति किलोवर गेली होती. त्यामुळे ग्राहकांना त्याची मोठी झळ सहन करावी लागली. त्यानंतर सरकारने साठेबाजीविरुद्ध कारवाईचे अस्त्र उगारले आणि दाळींच्या साठीवर धाडी टाकण्यात आल्या. त्यामुळे दाळीचे दर घसरु लागले. त्यापोठोपाठ सरकारचेे दाळीबाबत दररोज वेगवेगळे व्यक्तव्य होत असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. त्यात आता १०० रुपयात दाळ देऊ, असे मुख्यमंत्रांनी जाहीर केले आणि पुन्हा अस्थिरता निर्माण झाली. दाळ पडूनदेशभरातील कारवाईमुळे दाळ उपलब्ध होऊन तिचे भाव कमी होतील असे ग्राहकांना वाटू लागले. त्यात आता १०० रुपयांमध्ये दाळ मिळणार म्हटल्यावर त्यात आणखी भर पडली. याचा परिणाम होऊन बाजारात अस्थिरता पसरली. सध्या ग्राहक दाळ खरेदी करीत नसल्याने बाजारात दाळ पडून आहे. गेल्या महिन्याभरापासून दाळीची मागणी घटतच आहे. सध्या ग्राहक जेवढी पाहिजे तेवढीच दाळ विकत घेत आहे. यातही काटकसर होत असून एक किलो दाळीची जागा पावकिलोने घेतली आहे. विक्रेतेही हवालदिलभाव कमी होण्याच्या आशेने ग्राहक दाळ घेत नाही, त्यात विक्रेतेही संभ्रमात पडले असून जास्त भावाने दाळ खरेदी केली आणि कमी भावात विक्री करावी लागली तर मोठे नुकसान होईल, या विचाराने विक्रेतेही दाळ खरेदी करीत नसल्याचे चित्र आहे. आजही अनेकांना गेल्या महिन्यात जास्त भावात घेतलेली दाळ आज बाजारभावाप्रमाणे विकावी लागत आहे. दाळ येईल कोठूनसरकार वेगवेगळ्या घोषणा करुन दाळ उपलब्ध करुन देण्याचे म्हणत आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात दाळ कोठेच जप्त झालेली नाही, त्यामुळे येथे दाळ कोठून उपलब्ध करुन दिली जाईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच दाळ जर मुंबई अथवा इतर ठिकाणाहून येणार असेल तर ती कोणाकडे, म्हणजे रेशनवर की विक्रेत्यांकडे येईल की आणखी कोठे उपलब्ध करुन दिली जाईल, याबाबत काहीच स्पष्ट नसल्याने बाजारात संभ्रमावस्था आहे.
सरकारच्या घोषणांनी दाळ बाजारात अस्थिरता
जळगाव : तुरदाळीचे गगणाला भिडलेले भाव व त्यात दररोज सरकारच्या वेगवेगळ्या घोषणांमुळे तूर दाळीला ग्राहकी नसल्याने दाळ पडून आहे. भाव कमी होतील या आशेने दाळीची विक्री पाच टक्क्यांवर आली असून ग्राहकांसोबतच विक्रेतेही दाळ खरेदी करीत नसल्याने दाळ बाजारात अस्थिरता पसरली आहे.
By admin | Published: November 5, 2015 11:30 PM2015-11-05T23:30:01+5:302015-11-05T23:30:01+5:30