Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी कर्मचा-यांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट, जीपीएफचे व्याजदर वाढले

सरकारी कर्मचा-यांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट, जीपीएफचे व्याजदर वाढले

सरकारनं जनरल प्रॉव्हिडंट फंडा(GPF)चे व्याजदर वाढवले आहेत. ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीसाठी जीपीएफचा व्याजदर 7.6 टक्क्यांहून 8 टक्के करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:34 PM2018-10-09T16:34:58+5:302018-10-09T16:35:42+5:30

सरकारनं जनरल प्रॉव्हिडंट फंडा(GPF)चे व्याजदर वाढवले आहेत. ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीसाठी जीपीएफचा व्याजदर 7.6 टक्क्यांहून 8 टक्के करण्यात आला.

Government employees get bigger gifts, GPF interest rates high | सरकारी कर्मचा-यांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट, जीपीएफचे व्याजदर वाढले

सरकारी कर्मचा-यांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट, जीपीएफचे व्याजदर वाढले

नवी दिल्ली- सरकारनं जनरल प्रॉव्हिडंट फंडा(GPF)चे व्याजदर वाढवले आहेत. ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीसाठी जीपीएफचा व्याजदर 7.6 टक्क्यांहून 8 टक्के करण्यात आला. याचा फायदा लाखो सरकारी कर्मचा-यांना मिळणार आहे. सरकारनं छोट्या बचत योजनांवरही 0.40 टक्क्यांनी व्याज वाढवलं आहे. 
जीपीएफ म्हणजेच जनरल प्रॉव्हिडंट फंड हे असं खातं आहे जे फक्त सरकारी कर्मचारीच उघडू शकतात. सरकारी कर्मचारी या खात्यात स्वतःच्या पगारातील ठरावीक रक्कम ठेवून सदस्य बनू शकतात. 
जीपीएफ खात्यासंदर्भातील माहिती
या खात्यात जमा केलेली रक्कम सेवानिवृत्तीनंतर कर्मचा-यांना मिळते. तसेच ही गुंतवलेली रक्कम प्राप्तिकर कायदा 80 सीअंतर्गत येत असल्यानं करातूनही सूट मिळते. जीपीएफवरील जमा रकमेवर 8 टक्के व्याज दिलं जातं. 
कोण उघडू शकतं खातं- भारत सरकारमध्ये कार्यरत असलेला कोणताही सरकारी कर्मचारी जनरल प्रॉव्हिडंट फंडाचं खातं उघडू शकतो. हे खातं निश्चित पगार असलेल्या कर्मचा-यांसाठी गरजेचं आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचारी या खात्यासाठी पात्र नसतात. 
कसं काम करतं जीपीएफ- जनरल प्रॉव्हिडंट फंड एक सेव्हिंग अकाऊंट आहे. हे अकाऊंट एक सरकारी कर्मचारी उघडू शकतो. या खात्यात निश्चित कालावधीसाठी पगारातील ठरावीक रक्कम जमा करता येते. या खात्यातील रक्कम निवृत्तीनंतर दिली जाते. तसेच खातेधारकाला नॉमिनीही निवडता येऊ शकतो. खातेधारकाचं अपघाती निधन झाल्यास नॉमिनीला फायदे मिळतात.  
जीपीएफचे खास फीचर- जीपीएफ खात्यामध्ये तुम्हाला जीपीएफ अॅडवान्स हे फीचर मिळतं. हे जनरल प्रॉव्हिडंट फंड सेव्हिंग खात्यांतर्गत दिलं जातं. तसेच यावर व्याजमुक्त कर्जही मिळते. जीपीएफ खात्यातून काढण्यात आलेल्या रकमेवर कोणताही कर लागत नाही. 

Web Title: Government employees get bigger gifts, GPF interest rates high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा