Join us

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! निवृत्तीचे वय ६० वर्षे; जाणून घ्या आणखी मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 1:02 PM

सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या काही महिन्यांपासून असणाऱ्या मागणीला आता यश आले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या काही महिन्यांपासून असणाऱ्या मागणीला आता यश आले आहे. चंदीगडमधील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम चंदीगड शहरातील २०,००० हून अधिक सरकाऱ्यांसाठी लागू करण्यात आले आहेत. UT प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी चंदीगडमध्ये लागू होणारे केंद्रीय सेवा नियम अधिसूचित केले आहेत. माहितीनुसार, ही अधिसूचना जारी झाल्यानंतर आता सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे होणार आहे. वेतनश्रेणी आणि डीए केंद्र कर्मचार्‍यांसह शिक्षकांना दरमहा सुमारे ४००० रुपयांपर्यंत प्रवास भत्ता मिळेल. शाळांमध्ये आता उपमुख्याध्यापक पद असेल, सेवाज्येष्ठतेच्या आधारे नियुक्ती होणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी दोन वर्षांची रजा मिळणार आहे. इयत्ता १२ पर्यंतच्या दोन मुलांच्या पालकांना शिक्षण भत्ता मिळणार आहे.

या अधिसूचनेमुळे यूटी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी आणि सेवा शर्तींमध्येही बदल होणार आहेत. गृह मंत्रालयाने गेल्या वर्षी २९ मार्च रोजी चंदीगड कर्मचारी नियम, २०२२ अधिसूचित केले होते आणि पंजाब सेवा नियम १ एप्रिल २०२२ पासून केंद्रीय सेवा नियमांसह बदलण्यात आले होते, अधिसूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी थकबाकीसाठी पात्र असेल.ही मिळेल इतकेच नाही तर केंद्रीय सेवा नियम लागू केल्याने २०२२ पासून निवृत्तीचे वयही ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आले आहे.

यंदा तुमच्या पगारात हाेणार इतकी वाढ; काहींसाठी खुशी तर काहींना मिळेल ठेंगा

केंद्रीय सेवा नियम लागू झाल्यानंतर, कर्मचार्‍यांचे वेतनश्रेणी केंद्र सरकारच्या नियमांनुसार असतील, जे सध्या पंजाब सरकारी कर्मचार्‍यांच्या संबंधित श्रेणींनुसार होते. आता हे राष्ट्रपतींच्या केंद्रीय नागरी सेवेतील संबंधित सेवा आणि पदांवर नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या सेवाशर्तींप्रमाणे असतील आणि त्याच नियम आणि आदेशांद्वारे शासित होणार आहेत.

टॅग्स :सरकारकर्मचारी