Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी', दरवर्षी होणार पगारवाढ?

सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी', दरवर्षी होणार पगारवाढ?

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारी आता दरवर्षी वाढण्याची शक्याता आहे. सातव्या वेतन आयोगाचे प्रमुख जस्टिस एके माथुर यांनी यासंदर्भातले बदल करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2017 04:29 PM2017-08-06T16:29:19+5:302017-08-06T16:29:29+5:30

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारी आता दरवर्षी वाढण्याची शक्याता आहे. सातव्या वेतन आयोगाचे प्रमुख जस्टिस एके माथुर यांनी यासंदर्भातले बदल करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे.

 Government employees' silver will increase every year? | सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी', दरवर्षी होणार पगारवाढ?

सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी', दरवर्षी होणार पगारवाढ?

नवी दिल्ली, दि. 06 - सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारी आता दरवर्षी वाढण्याची शक्याता आहे. सातव्या वेतन आयोगाचे प्रमुख जस्टिस एके माथुर यांनी यासंदर्भातले बदल करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या पगारवाढीसाठी कोणते निकष ठेवता येतील, फक्त वेतन आयोगांवर अवलंबून असलेली सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढीच्या प्रक्रियेऐवजी दरवर्षी पगारवाढी करता येईल का? यावरही अभ्यास करण्यात येणार आहे.
वेतन आयोगामुळे सराकरी तिजोरीवर पडणारा बोझा दरवर्षी वेतनवाढ दिल्यानं कमी होईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
कंफेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्सचे प्रेसिडंट केके एन कुट्टी यांच्या म्हणण्यानुसार, पगारवाढीसंदर्भात सरकारने संकेत दिले आहेत. मात्र, या पगारवाढीचं स्वरुप कसे असेल, कोणत्या आधारावर पगार वाढवली जाईल, याबाबत सरकारने अद्याप कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात चर्चेसाठी सरकार ज्यावेळी आम्हाला बोलावेल, त्यानंतर पुढील निर्णय घेऊ.

Web Title:  Government employees' silver will increase every year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.