Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारने रूफटॉप कार्यक्रमाचा वाढवला कालावधी, आता तुम्हीही घराच्या छतावर लावू शकता सोलर पॅनेल

सरकारने रूफटॉप कार्यक्रमाचा वाढवला कालावधी, आता तुम्हीही घराच्या छतावर लावू शकता सोलर पॅनेल

rooftop program : या योजनेत अर्ज केल्यास तुमच्या घराचे वीज बिलही (Electricity Bill) शून्य होईल आणि तुम्हाला मोठी सबसिडीही मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 11:02 AM2022-12-09T11:02:27+5:302022-12-09T12:19:36+5:30

rooftop program : या योजनेत अर्ज केल्यास तुमच्या घराचे वीज बिलही (Electricity Bill) शून्य होईल आणि तुम्हाला मोठी सबसिडीही मिळेल.

government extended duration of rooftop program till 31 march 2026 | सरकारने रूफटॉप कार्यक्रमाचा वाढवला कालावधी, आता तुम्हीही घराच्या छतावर लावू शकता सोलर पॅनेल

सरकारने रूफटॉप कार्यक्रमाचा वाढवला कालावधी, आता तुम्हीही घराच्या छतावर लावू शकता सोलर पॅनेल

नवी दिल्ली : जर तुम्ही अद्याप सरकारच्या रुफटॉप योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण, सरकारने सरकारने रूफटॉप कार्यक्रमाचा  (Rooftop Solar Program) कालावधी 31 मार्च 2026 पर्यंत वाढवला असून, छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देण्याचे आवाहन केले आहे.

तुम्हालाही तुमचे वीज बिल कमी करायचे असेल, तर मोदी सरकार तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आली आहे. या योजनेत अर्ज केल्यास तुमच्या घराचे वीज बिलही (Electricity Bill) शून्य होईल आणि तुम्हाला मोठी सबसिडीही मिळेल. यासाठी सरकारी पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, रुफटॉप सोलर प्रोग्रामला मार्च 2026 पर्यंत वाढवल्यामुळे, यामध्ये मिळणाऱ्या सबसिडीचे लक्ष्य पूर्ण होईपर्यंत मिळत राहील. मंत्रालयाने म्हटले आहे की, सर्व निवासी ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करण्यासाठी कोणत्याही कंपनीला कोणतीही अतिरिक्त रक्कम देऊ नये किंवा मीटर आणि चाचणीसाठी संबंधित वितरण कंपनीने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम देऊ नये.

ईमेलद्वारे केली जाऊ शकते तक्रार
कोणत्याही विक्रेता, एजन्सी किंवा व्यक्तीकडून अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास ईमेलद्वारे तक्रार केली जाऊ शकते. ज्या ग्राहकांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवायचे आहेत, ते नॅशनल पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण देशासाठी तीन किलोवॅट क्षमतेसाठी 14,588 रुपये प्रति किलोवॅट सबसिडी दिली जाते.

43,000 रुपयांपेक्षा जास्त सबसिडी 
दरम्यान, सरकार तीन किलोवॅटच्या सोलर पॅनेलवर 43,000 रुपयांपेक्षा जास्त सबसिडी देत ​​आहे. अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्याची सुवर्णसंधी आहे. तीन किलोवॅटच्या सोलर पॅनलने तुम्ही तुमच्या घरातील एसी, फ्रीज, कुलर, टीव्ही, मोटार, पंखा इत्यादी सुरू होऊ शकते. यासाठी तुमचे बिल दर महिन्याला शून्यावर येईल. तुम्ही तुमची अतिरिक्त वीज भाडेकरू किंवा शेजाऱ्यांना विकूनही पैसे कमवू शकता.

Web Title: government extended duration of rooftop program till 31 march 2026

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.