लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बुडीत कर्जांमुळे (एनपीए) बँकांवर पडलेला ताण कमी करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेने ५0 मोठ्या खात्यांवरच लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, त्यात काही संचार क्षेत्रातील कंपन्याही असू शकतील. या ५0 खात्यांत सुमारे ५ लाख कोटी रुपये थकले आहेत. ५0 मोठ्या खात्यांच्या यादीत व्हिडीओकॉन, जिंदाल समूहाच्या जिंदाल स्टील अॅण्ड पॉवर यांसारख्या संस्था, पुंज लॉयड, जेपी समूह, लॅन्को समूहातील लॅन्को इन्फ्राटेक यांसारख्या संस्था, मॉनेट इस्पात, एस्सार आणि भूषण स्टील यांचा समावेश आहे. डिसेंबर २0१६पर्यंत फेररचना केलेल्या कुकर्ज खात्यांचा यांत समावेश आहे. या ५0 खात्यांत ४ ते ५ लाख कोटी रुपये आहेत. एप्रिल २0१६पासून १ लाख कोटींच्या नव्या कुकर्जांची भर पडली आहे. ३१ डिसेंबर २0१६ रोजी सरकारी बँकांची बुडीत कर्जे ६ लाख कोटींच्या घरात गेली. यादीतील काही खाती अद्याप बुडीत कर्र्जे म्हणून घोषित नाहीत. त्यातील काही खाती लक्षवेधी खाती श्रेणीतील १ वा २ गटात येतात. त्यांचे व्याज ९0 दिवसांहून जास्त काळ थकले आहे. यातील काही नावांबाबत पंतप्रधान कार्यालयाला कळविण्यात आले आहे.
बड्या ५0 खात्यांवर सरकारची नजर
By admin | Published: May 31, 2017 12:33 AM